शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीवर सामूहिक बलात्कार, सुटकेच्या प्रयत्नात पाचव्या मजल्यावरून कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2017 08:54 IST

दक्षिण मुंबईत सारंगी इमारतीत एका 27 वर्षीय मुलीवर गुरुवारी रात्री तिघांनी सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 19 - दक्षिण मुंबईतील कुंभारवाडा परिसरात पायधुणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक 27 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन डांबून ठेवले होते. नराधमाच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात या महिलेचा तोल जाऊन ती इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडली आणि गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पायधुनी भागात शुक्रवारी पहाटे ही तरुणी जखमी अवस्थेत असल्याची सूचना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईत सारंगी इमारतीत एका 27 वर्षीय मुलीवर गुरुवारी रात्री तिघांनी सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. फारुख खान, संतोष कनोजिया आणि अकबर अशी या तिघांची नावे आहेत. पोलिसांनी पडित तरुणीला सरकारी हॉस्पीटलमध्ये दाखल केले आहे. ही तरुणी उत्तरप्रदेशची रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. आपल्या एका ओळखीच्या व्यक्तीसोबत ती पायधुनीच्या एका इमारतीत दाखल झाली होती. या व्यक्तीनं काम मिळवून देण्याच्या बहाण्यानं तिला आणलं होतं. इथं तिच्यावर दोन अनोळखी लोकांनी आत्याचार केला.या तिघा नराधमांनी त्या मुलीला सारंगी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर डांबून ठेवले होते. नराधमांच्या तावडीतून तिने कसाबसा पळ काढला आणि तिथल्या शौचालयात जाऊन लपली. जीव वाचवण्यासाठी तिने त्या शौचालयाच्या खिडकीतून उडी मारली. यामुळे ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. पीडित मुलीची परिस्थीती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.