शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

सोलापूरच्या मुलीवर गँगरेप, वसईचे ३ अटकेत

By admin | Updated: June 17, 2016 00:45 IST

सोलापूर रेल्वे स्थानकावर एकट्या बसलेल्या १४ वर्षाच्या मुलीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून तिला वसईतील गवराईपाडा येथे आणून तिच्यावर आरोपीने आपल्या दोन मित्रांसोबत गँगरेप

वसई : सोलापूर रेल्वे स्थानकावर एकट्या बसलेल्या १४ वर्षाच्या मुलीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून तिला वसईतील गवराईपाडा येथे आणून तिच्यावर आरोपीने आपल्या दोन मित्रांसोबत गँगरेप केला असून वालीव पोलीसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. सोलापूरमध्ये राहणारी एक मुलगी वडिलांशी भांडण झाल्याने घर सोडून निघून सोलापूर रेल्वे स्टेशनवर येऊन बसली होती. मात्र, तिच्याजवळ पैसे नसल्याने पुढे काय करायचे अशा विचारात ती असतांना वसई पूर्वेकडील गवराईपाडा परिसरात राहणाऱ्या राजेश याने तिच्याशी ओळख वाढवून तिला नोकरी देण्याचे आमिष दाखवले व ७ जून २०१६ रोजी तिला वसई येथील घरी आणले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ८ जूनला त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर कंपनीत त्याच्या सोबत काम करणाऱ्या राजकुमार व फरीद या मित्रांनीही घरी येऊन तिच्यावर बलात्कार केला. तिघांनी सलग तीन दिवस तिच्यावर वारंवार अत्याचार केले.या मुलीकडे कपडे नसल्याने तिने शेजारी राहणाऱ्या महिलेकडून कपडे घेतले व तिला घडला प्रकार सांगितला. ही गोष्ट राजेशला समजल्यावर त्याने तिला बेदम मारहाण केली. दोन दिवसांनी राजेश कामावर गेल्यानंतर शेजारी राहणाऱ्या महिलेने तिला मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात नेले. त्याठिकाणी मुलीने आपल्यासोबत झालेल्या पाशवी अत्याचाराची हकीकत कथन केल्यानंतर पोलीसांनी बलात्कार, व पोस्को अन्वये देखील शून्य नंबरने गुन्हा दाखल करून तो वालीव पोलीस ठाण्याकडे वर्ग केला.(प्रतिनिधी)तीन ठिकाणाहून वळल्या आरोपींच्या मुसक्या- वालीव पोलिसांनी गँगरेपमधील तिन्ही आरोपींना बुधवारी मध्यरात्री वेगवेगळ्या ठिकाणाहून पकडले आहे. - पोलिसांनी आरोपी राजेश, राजकुमार आणि फरीद यांच्याविरोधात मारहाण, बलात्कार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माळी करत आहेत.- एवढा प्रकार भर वस्तीत झाला तरी पिडीतेने आरडा ओरड कशी व का केली नाही असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर तपासादरम्यान शोधले जाणार आहे.