शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

गंगाखेड शुगरच्या अध्यक्ष, संचालक मंडळावर गुन्हा

By admin | Updated: July 7, 2017 05:02 IST

८ ते १० हजार शेतकऱ्यांच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून ३२८ कोटी रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक केल्याप्रकरणी

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (जि. परभणी) : ८ ते १० हजार शेतकऱ्यांच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून ३२८ कोटी रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक केल्याप्रकरणी गंगाखेड शुगर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांच्यासह संचालक मंडळ, कर्मचारी आणि सहा बँकांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. शेतकऱ्यांच्या फसवणुकीबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने ४ जुलै रोजी प्रसिद्ध केले होते. गंगाखेड तालुक्यातील विजयनगर माखणी येथील गंगाखेड शुगर अ‍ॅण्ड एनर्जी प्रा़ लि़ या साखर कारखान्याच्या माध्यमातून कारखान्याचे सभासद असणाऱ्या ८ ते १० हजार शेतकऱ्यांच्या ाावावर बनावट कागदपत्रांच्या आधारे ३२८ कोटी रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक केली, अशी फिर्याद गिरीधर शिवाजी सोळंके (रा. नागापूर, ता. परळी) या शेतकऱ्याने गंगाखेड पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री ११.५५ वाजता दिली. या फिर्यादीवरून कारखान्याचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांच्यासह संचालक मंडळ, आर्थिक व्यवहार सांभाळणारे तसेच पीक कर्जाची कामे हाताळणारे शेतकी अधिकारी, कर्मचारी, बनावट शिक्के व कागदपत्रे तयार करणारे कर्मचारी, खाजगी व्यक्ती आणि आंध्रा बँक, युको बँक, युनायटेड बँक, बँक आॅफ इंडिया, सिंडिकेट बँक, रत्नाकर बँकेचे अधिकारी यांच्याविरूद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात बुधवारी मध्यरात्री ११़५५ वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल झाला आहे़ या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संजय हिबारे करीत आहेत़ परभणीचे पथक औरंगाबादेतगुट्टे यांच्यावर गंगाखेड पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री ११.५५ वाजता गुन्हा दाखल झाल्यानंतर तातडीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हिबारे यांच्या नेतृत्वाखालील एक पथक औरंगाबादला रवाना झाले. मध्यरात्रीच हे पथक औरंगाबाद येथील सातारा परिसरातील त्यांच्या घरी पोहचले व तेथे गुट्टे यांना नोटीस बजावली. शुक्रवारी परभणीतील एलसीबीच्या कार्यालयात हजर राहाण्यास सांगितले आहे. सहा बँकांकडून मिळवले कर्जशेतकरी गिरीधर सोळंके यांनी दिलेल्या फिर्यादीत आंध्रा बँक (३९.१७ कोटी), युको बँक (४७.७८ कोटी), युनायटेड बँक (७६.३२ कोटी), बँक आॅफ इंडिया (७७.५९ कोटी), सिंडिकेट बँक (४७.२७ कोटी) व रत्नाकर बँक (४०.२० कोटी) या बँकांच्या अधिकाऱ्यांनी ज्यांचे बँकेमध्ये खाते नाही अशा शेतकऱ्यांच्या नावाने खाते उघडून त्यांच्या नावाने कर्ज घेऊन ती संपूर्ण रक्कम गंगाखेड शुगर अ‍ॅण्ड एनर्जी या कारखान्याच्या करंट अकाऊंटमध्ये स्वत:च्या फायद्यासाठी वळती केल्याचे म्हटले आहे.मृतांच्या नावावरही कर्जसोळंके यांनी दिलेल्या फिर्यादीत काही मृत व्यक्तींच्या नावावरही कर्ज घेतले असल्याचे नमूद केले आहे. त्यामध्ये चार मृतांची नावे देण्यात आली असून त्यांच्या नावावर एकूण ८ लाख २९ हजार ८५० रुपयांचे कर्ज उचलण्यात आले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हजर राहणार - गुट्टेपरभणी पोलिसांनी बुधवारी रात्री नोटीस बजावली आहे. त्यांच्या नोटीसप्रमाणे चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहणार आहे. कोणाच्याही नावे कर्ज उचलले नाही. आपल्याविरुद्ध दाखल गुन्हा हा पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित असल्याची प्रतिक्रिया रत्नाकर गुट्टे यांनी दिली.