शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
3
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
4
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
6
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
7
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
8
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
9
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
10
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
11
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
12
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
13
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
14
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
15
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
16
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
17
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
18
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
19
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
20
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!

चोरट्या महिलांची टोळी जेरबंद

By admin | Updated: August 3, 2016 01:54 IST

खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत जाऊन दागिन्यांची चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले.

पिंपरी : खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत जाऊन दागिन्यांची चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. या टोळीतील महिलांना सोलापूर आणि हडपसरमधून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, एक मोटार असा पाच लाख ४० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे आरोपींना पकडणे पोलिसांना शक्य झाले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव शांताराम पवार (वय ३६), चंदा अप्पा जाधव (वय ३८), सविता निवृत्ती जाधव (वय ३७, सर्व रा. करमाळा, सोलापूर), कल्पना अंकुश कांबळे (वय ३२, रा. गोसावीवस्ती, हडपसर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या महिला आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी रवींद्र देवकर (वय ३२, रा. कस्पटेवस्ती, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. २७ जुलैला आरोपी महिला दागिने खरेदीच्या बहाण्याने देवकर यांच्या कस्पटेवस्ती येथील सराफी पेढीत गेल्या . दुकानदार देवकर यांची नजर चुकवून दोन आरोपी महिलांनी पेढीतील दोन लाख ६६ हजार रुपये किमतीचे १३ तोळे दागिने असलेला ट्रे लंपास केला. हा प्रकार सराफी पेढीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. या गुन्ह्याच्या वाकड पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट पाचचे अधिकारीही तपास करत होते. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे आणि पोलीस नाईक भरत रणसिंग यांना आरोपी सदाशिव याने त्याच्या साथीदार महिलांसह वाकड येथील देवकर यांच्या सराफी पेढीत चोरी केली असून, ते सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यात गेले असल्याचे माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्यांना पोलिसांनी जेरबंद केले. फुगेवाडीत वृद्धाला मारहाणजागेच्या वादातून एका वृद्धाला फुगेवाडी येथे मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. रवींद्रसिंग कोहली (वय ६३, रा. फुगेवाडी) असे मारहाणीत जखमी झालेल्या वृद्धाचे नाव आहे. कोहली यांचे दापोडीमध्ये एक दुकान आहे. या दुकानाचा करार त्यांनी रद्द केला असल्यामुळे त्यांच्यावर हा हल्ला झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या हल्ल्यात त्यांचा मुलगा एकमसिंग कोहली जखमी झाला आहे.