शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

महागड्या दुचाकींची चोरी करणारी टोळी गजाआड

By admin | Updated: November 10, 2016 16:12 IST

बुलेट चोरी करणा-या तीन आरोपींना २१ लाख ७५ हजार रूपये किंमतीच्या चोरीच्या २० दुचाकींसह ताब्यात घेतले. त्यामध्ये १७ बुलेट आणि तीन अन्य दुचाकी आहेत.

ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 10 -  महागड्या दुचाकी ते सुद्धा प्रामुख्याने बुलेट चोरणारी अहमदनगर, पाथर्डी येथील टोळी वाकड पोलिसांनी जेरबंद केली. बुलेट चोरी करणा-या तीन आरोपींना २१ लाख ७५ हजार रूपये किंमतीच्या चोरीच्या २० दुचाकींसह ताब्यात घेतले. त्यामध्ये १७ बुलेट आणि तीन अन्य दुचाकी आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर आणि मुंबई येथे त्यांनी केलेले दुचाकी चोरीचे २० गुन्हे उघडकीस आले, अशी माहिती वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्रीधर जाधव यांनी  पत्रकार परिषदेत दिली.
पिंपरी-चिंचवड शहरात सक्रीय असलेली चोरट्यांची टोळी अहमदनगर, पाथर्डी येथे असल्याची माहिती  सहायक पोलीस निरिक्षक बालाजी पांढरे तसेच तपास पथकातील कर्मचारी शाम बाबा यांना मिळाली. त्यानुसार पाथर्डी येथे पथक रवाना झाले. नंबर प्लेट नसलेल्या बुलेटवरून आलेल्या दोन चोरट्यांना अत्यंत चपळाईने त्यांनी पकडले. गणेश विश्वनाथ भाबड (वय २४,रा.आगसखांड, पाथर्डी)  अंबादास विक्रम मिसाळ (वय ३०,रा.पिंपळनेर, शिरूरकासार,बीड ) अशी त्या दोन आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, सागर वसंत गिते (वय १९,रा.पाथर्डी) या आणखी एका साथीदाराचे नाव पुढे आले. त्यांची गुन्ह्याची पद्धत लक्षात घेता, एक लाख ते दीड लोख रुपये किंमतीच्या बुलेट दुचाकीच ते चोरत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. बुलेट विक्रीतुन मोठी रक्कम मिळत असल्याने या टोळीचे चोरी करताना, बुलेट हेच टार्गेट होते. अहमदनगर तसेच बीड येथे बुलेट विक्री करण्याच्या उद्देशाने त्यांनी एका ठिकाणी नंबर नसलेल्या १७ बुलेट व अन्य तीन दुचाकी ठेवल्याचे पोलिसांनी शोधून काढले. विविध ठिकाणी केलेल्या गुन्हयांची कबुली आरोपींनी दिली. 
अप्पर पोलीस आयुक्त उत्तर विभाग शशीकांत शिंदे, पिंपरी विभागाचे पोलीस उपायुकत डॉ. बसवराज तेली, परिमंडल दोनचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, चतुशृंगी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त वैशाली जाधव-माने,  पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त  राम मांडुरके, वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्रीधर जाधव, अमृत मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही कारवाई केली. त्यामध्ये सहायक पोलीस निरिक्षक पांढरे,पोलीस उपनिरिक्षक तुकाराम फड, पोलीस कर्मचारी शाम बाबा, बिभिषण कन्हेरकर, रोहिदास टिळेकर, अशोक दुधवणे, प्रमोद भांडवलकर, रमेश गायकवाड, भैराबा यादव, स्वप्निल वराडे, विक्रांत गायकवाड या पोलीस कर्मचा-यांनी मोलाची कामगिरी केली.