शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी तरुणीवर सामूहिक बलात्कार

By admin | Updated: January 19, 2015 04:29 IST

उचल घेऊनही कामासाठी न आल्याच्या रागातून एका मुकादमाने ऊसतोडणी मजुराच्या कुटुंबातील तिघांसह तरुणीला घरात डांबून ठेवले

बर्दापूर (जि. बीड) : उचल घेऊनही कामासाठी न आल्याच्या रागातून एका मुकादमाने ऊसतोडणी मजुराच्या कुटुंबातील तिघांसह तरुणीला घरात डांबून ठेवले. तसेच भावासमोरच तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली़ या प्रकरणी मुकादम महादेव भागवतसह चौघांना पोलिसांनी अटक केली असून, विशाल भागवत आणि मंदाकिनी भागवत हे फरार आहेत.मुकादम महादेव भागवत याच्या टोळीत मध्य प्रदेशातील पाच कुटुंबाचा समावेश होता. दोन महिन्यांपूर्वी कर्नाटकातील साखर कारखान्यावर ऊसतोडणीसाठी त्याला ही टोळी पाठवायची होती. ३ लाख रुपये उचलही या लोकांना देण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे हे लोक भागवत याच्याकडे आले. परंतु त्यानंतर टोळीतील चार कुटुंबांतील लोक परस्पर निघून गेल्याने त्याला कर्नाटकात टोळी पाठविता आली नाही. पीडित तरुणीचे कुटुंब मध्य प्रदेशच्या मेरणा जिल्ह्यातील शहापूर येथून आले होते. त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय उरला नसल्याने ते याच परिसरात थांबले आणि दगड फोडण्याचे काम करू लागले. पाच दिवसांपूर्वी भागवत याने या कुटुंबातील लोकांकडे पैशांची मागणी करीत तरुणीसह दोन महिला आणि तिच्या भावाला सुगाव येथे आणले. त्याच्या घराजवळच एका खोलीत चौघांना डांबून ठेवले. दरम्यान, महादेव भागवत, पांडुरंग उर्फ पांडू राजेभाऊ फरताडे, अंगद विष्णू शिंदे, नानासाहेब चत्रभुज शिंदे, सुरेश त्रिंबक मस्के, विशाल महादेव भागवत यांनी पीडित तरुणीला दोन दिवसांपूर्वी रात्री १०च्या सुमारास तेथून शेतात नेले. तिच्या भावाने विरोध केल्याने त्याला बेदम मारहाण करून त्यालाही ते सोबत घेऊन गेले. शेतात चौघांनी तिला पाणी म्हणून मद्य पिण्यासाठी दिले. ती आणि तिचा भाऊ याला विरोध करू लागल्यावर चौघांनी त्या तरुणीला सिगारेटचे चटके दिले आणि भावाला चाबकाचे फटके देण्यात आले़ त्यानंतर चार नराधमांनी पीडित तरुणीवर तिच्या भावासमोरच अत्याचार केला. पहाटे पुन्हा या दोघांना घरी आणून त्यांना डांबून ठेवण्यात आले. (वार्ताहर)