पुणे : विवाहित महिलेवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार करणार्या त्रिकुटाला पोलिसांनी अटक केली़ या महिलेने प्रसंगावधान दाखवत आरडाओरडा केल्यामुळे गजाआड जावे लागले. बाणेर येथील पवार वस्तीतील मोकळ्या मैदानात रविवारी सायंकाळी सात ते साडेसातदरम्यान हा प्रकार झाला. मुळचे मध्य प्रदेशमधील असलेले हे आरोपी येथेच सुरू असलेल्या बांधकामाच्या साइटवर रखवालदाराचे काम करतात. आरोपींच्या म्होरक्याला नागरिकांनी पकडून पोलिसांना पाचारण केले. यानंतर पोलिसांनी शिताफीने हालचाली करून अन्य दोघांना काही वेळातच अटक केली. सोमवारी न्यायालयाने त्यांना २६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. रितेश महेशकुमार सविता (२३), शेरसिंग जनकसिंग राजपुत ( २९) आणि ब्रिजेशसिंग सरदारसिंग राजपुत (२०) अशी आरोपींची नावे आहेत. ४० वर्षीय महिला त्यांच्या अत्याचाराला बळी पडली. ही महिला बिगारी काम करते. बाणेर येथील एका बांधकामाच्या ठिकाणी झोपडीत राहते. तरुण मुलगा आणि पती यांच्यासह ती तीन-चार वर्षांपासून विविध बांधकामांच्या ठिकाणी झोपडीत राहून उदरनिर्वाह करते. हे कुटुंब मूळचे अकोले तालुक्यातील आहे. १५ दिवसांपूर्वी त्यांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला होता.
पुण्यात सामूहिक बलात्कार
By admin | Updated: May 20, 2014 03:57 IST