शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

गणेशोत्सवाला ‘द्विअर्थी’ गाण्यांचे लागतंय गालबोट

By admin | Updated: September 6, 2016 00:47 IST

तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटायं लागलं’, ‘बंबू दालके बारीक कुटना, देर रात को आनंद लुटला’, बघ बघ अगं सखे कसं गुबूगुबू वाजतंय,

पुणे : तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटायं लागलं’, ‘बंबू दालके बारीक कुटना, देर रात को आनंद लुटला’, बघ बघ अगं सखे कसं गुबूगुबू वाजतंय, तुझा झगा ग झगा ग वाऱ्यावर उडतोय, ‘पप्पी दे पप्पी दे पारोला’ यांसारख्या द्विअर्थी गाण्यांच्या सादरीकरणामुळे गणेशोत्सवाचे वातावरण गढूळ होत असून, उत्सवाला एकप्रकारे गालबोट लागतंय! महिलांना मात्र डीजेच्या दणदणाटात ही गाणी ऐकताना खूपच लाजिरवाणे वाटते; मात्र ऐकण्याशिवाय गत्यंतर नाही, अशी परिस्थिती आहे. परंतु त्याची तमा न बाळगता उत्सवाच्या दहा दिवसांसह मिरवणुकीच्या काळात डिजेंच्या माध्यमातून ही गाणी लावून उत्सवाच्या पावित्र्याचा भंग करीत आहेत. या गाण्यांवर कुठलीही ‘सेन्सॉरशीप’ नाही. गणेशोत्सव म्हटला, की कार्यकर्त्यांच्या उत्साहाला एकप्रकारे उधाणच येते, उत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात आणि मिरवणुकीमध्ये भाविकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी डिजेच्या माध्यमातून वेगवेगळी गाणी लावण्यावर मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून भर दिला जातो. द्विअर्थी गाण्यांचाच यात अधिक भरणा असतो, या गाण्यांची वाढती क्रेझ लक्षात घेता उत्सवाच्या काही महिने अगोदर अशा गाण्यांच्या सीडी बाजारात येऊ लागतात, गणेशोत्सवात ही गाणी हमखास वाजणारच, याची खात्री असल्यानेच अशा गाण्यांची बाजारपेठ विकसित झाली आहे. डिजेंना अशी गाणी लावण्याची खास फर्माईश कार्यकर्त्यांकडून केली जाते. उत्सवाच्या काळात अशी गाणी वाजवून रस्त्यावर नृत्यातून धांगडधिंगा करण्याचे प्रमाणही वाढत आहे. मात्र, अशा गाण्यांमुळे उत्सवाच्या पावित्र्याचा भंग होत आहे, याचे भानही राहिलेले नाही. एकदा ही गाणी वाजायला लागली की ती ऐकण्याशिवाय भाविकांना गत्यंतरच नसते. महिलांना तर त्या गाण्याचे शब्द ऐकून मेल्याहून मेल्यासारखे होते. अशा गाण्यांवर ‘सेन्सॉरशीप’चे बंधन असणे गरजेचे आहे; मात्र या गाण्यांसाठी सेन्सॉरशीपची चौकटीच निर्माण केली नसल्यामुळे गीतकार आणि म्युझिक कंपन्यांचे चांगलेच फावले आहे.>गणेशोत्सवामध्ये द्विअर्थी गाणी वाजावीत किंवा नाहीत, याबाबत विशिष्ट मत असण्याचे कारण नाही. शुद्धीत असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला अशी गाणी आवडणारच नाहीत. गर्दी एकत्र जमली की मेंदू राहत नाही. सध्या गणेशोत्सवातील सेलिब्रेशनची व्याख्याच बदलली आहे. गणेशोत्सवामध्ये थिरकता यावे, अशी चांगली गाणीही उपलब्ध आहेत याचा विचारच केला जात नाही. शुद्धीवर राहणाऱ्यांची संख्या वाढली की अशी गाणी आपोआप बंद होतील.- सलील कुलकर्णी, संगीतकार>चित्रपट आणि जाहिरातीसाठी ‘सेन्सॉर’ आहे. मात्र, खासगी अल्बमधील गाण्यांना सेन्सॉर नाही. ती गाणी व्हिडिओमध्ये येत नाहीत, तोवर कुणीच काही करू शकत नाही. विविध मालिका, यूट्यूबसारखी अनेक नवीन माध्यमे समोर आली आहेत. परंतु सिनेमॅटोग्राफी अ‍ॅक्ट १९५२ मध्ये अजूनही नवीन माध्यमांचा समावेश झालेला नाही. या कायद्यात दुरूस्ती करून सर्व गोष्टी एकाच छताखाली आणणे गरजेचे आहे.- सुनील महाजन, माजी सदस्य, सेन्सॉर बोर्ड