शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव मंडळांचा सनबर्नला विरोध

By admin | Updated: December 30, 2016 04:53 IST

अमली पदार्थांचा वापर, कर बुडवेगिरी यांसह विदेशी संस्कृतीचा अंतर्भाव असलेल्या वादग्रस्त सनबर्न फेस्टिव्हलला पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी विरोध

पुणे : अमली पदार्थांचा वापर, कर बुडवेगिरी यांसह विदेशी संस्कृतीचा अंतर्भाव असलेल्या वादग्रस्त सनबर्न फेस्टिव्हलला पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी विरोध केला आहे. १२५ वर्षांच्या गणेशोत्सवालाही अनेक परवानग्या घेऊन पुढे जावे लागते. मात्र, सनबर्न फेस्टिव्हलला त्वरित परवानग्या मिळतात, त्यामुळे येथे कोणत्या प्रकारची त्वरित एक खिडकी योजना राबविली आहे तशी योजना गणेशोत्सवातदेखील राबविणार का? असा प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.गणेशोत्सव मंडळांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या जय गणेश व्यासपीठातर्फे पुण्यात होत असलेल्या सनबर्न फेस्टिव्हलला विरोध दर्शविणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या वेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुनील रासने, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, शनिवार पेठ मेहुणपुरा मंडळाचे पराग ठाकूर, साखळीपीर तालीम मंडळाचे भाई कात्रे, काळभैरवनाथ मंडळाचे सागर पवार, साईनाथ मंडळ ट्रस्टचे पीयूष शहा, सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई, शुभांगी आफळे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी जगताप यांनी निवेदन स्वीकारले.शिरीष मोहिते म्हणाले, ‘‘गणेशोत्सव मिरवणुकीच्या काळात स्पिकर्स व ढोल-ताशांच्या आवाजाची मयार्दा कॅलिब्रेशन मीटरने मोजली जाते. तीच पद्धत येथे अवलंबणार का, असा गणेशोत्सव कार्यकर्त्यांचा सवाल आहे. या फेस्टिव्हलमुळे पुण्याच्या संस्कृतीला गालबोट लागण्याची शक्यता आहे.’’ विधायक मित्र मंडळ कसबा पेठ, नवदीप मित्र मंडळ, महाराष्ट्र तरुण मंडळ, निंबाळकर तालीम मंडळ, तरुण अशोक मंडळ ट्रस्ट, चक्रवर्ती अशोक मंडळ, सत्यशोधक मित्र मंडळ, वीराची तालीम मंडळ, अखिल शनिवार नवरात्र मंडळ आदी मंडळांच्या कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.वर्षानुवर्षे साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात मंडळांना मंडप, स्पिकर व इतर परवानग्या घेतल्यानंतरच उत्सव साजरा करण्यास सांगितले जाते. मिरवणुकीत अथवा उत्सवात ध्वनिक्षेपकाची मर्यादा थोडी ओलांडली, तरी मंडळांवर गुन्हे दाखल होतात. सनबर्नसाठी खूप मोठ्या प्रमाणात स्पिकर्स लावले जात आहेत. त्यांच्या मर्यादेबाबत आणि परवानग्यांबाबत काय करणार, असा सवालही त्यांनी केला. - पराग ठाकूर, अध्यक्ष, शनिवार पेठ मेहुणपुरा मंडळ