शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गणेशगल्ली गणपतीच्या दानपेटीत ४० लाख रुपये

By admin | Updated: September 20, 2016 03:02 IST

या पत्राची संकल्पना ओमकार धुरी यांची आहे. या पत्रात मनोभावे सेवा केली त्यासाठी बाप्पा आपल्या भक्तांचे आभार मानतो आहे.

मुंबई : ‘बाप्पा’ला निरोप देऊन काही दिवस उलटले असले तरी अजूनही गणेशोत्सवाचा फिव्हर दिसून येतो आहे. मुंबई शहर-उपनगरातील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळे बाप्पाच्या दानपेटीतील रकमेची मोजदाद करण्यात व्यस्त आहेत. ‘मुंबईचा राजा’ अशी ख्याती असणाऱ्या गणेशगल्लीच्या बाप्पाच्या दानपेटीतही आतापर्यंत ४० लाखांच्या नोटा जमा झाल्याची माहिती मंडळाने दिली. याशिवाय, अजूनही नाण्यांची मोजणी सुरू आहे. तसेच, बाप्पाच्या चरणी काही वस्तूही अर्पण करण्यात आल्या आहेत. नाण्यांची मोजणी पूर्ण झाली की, हुंड्यांमधील वस्तूंची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली मंडळाचे खजिनदार स्वप्निल परब यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)>बाप्पाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल‘मुंबईचा राजा’ने आपल्या भक्तांना लिहिलेले पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. या पत्राची संकल्पना ओमकार धुरी यांची आहे. या पत्रात मनोभावे सेवा केली त्यासाठी बाप्पा आपल्या भक्तांचे आभार मानतो आहे. या पत्रातील मथळा...ओळखलात का मला तुमचा लाडका मुंबईचा राजा. पत्र लिहण्यास कारण की मी सुखरूप पोहचलो. आपण ११ दिवस केलेली धमाल मज्जा आताच आई-बाबांना सांगितली..खरे सांगायचे तर तुमचा निरोप घेताना माझ्या डोळ्यांतही अश्रू होते. पावसाच्या सरीत तुम्हाला ते समजत नव्हते....तुम्ही सर्वांनी केलेली मनोभावे सेवा आणि हो, मुंबईची सेवा करणाऱ्या खऱ्या मानकऱ्यांना आरतीचा मान दिल्याबद्दल तुमचे खूप कौतुक वाटते.. आणि हो., एक सांगायचे राहिलेच पोलिसांचा सन्मान करा तुमचे खरे विघ्नहर्ता तेच आहेत. चला तर मग पुन्हा एकदा त्याच जोषात, त्याच जल्लोषात तयारीला लागा. मी ९० व्या वर्षात पदार्पण करणार आहे. पुन्हा येईन नवीन रूपात तुमच्या भेटीला, आपल्याच गणेशगल्लीत !