नारायण जाधव - ठाणो
राजकीय सारीपटावरील सुंदोपसुंदी आणि पक्षीय हेवेदाव्यांमुळे आपला बालेकिल्ला असलेल्या बेलापूर मतदारसंघात या खेपेला राज्याचे उत्पादन शुल्क तथा ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री गणोश नाईक यांना चांगलीच कसरत करावी लागणार आह़े
एकेकाळी दक्षिण दिल्लीनंतर सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून बेलापूर मतदारसंघ ओळखला जात अस़े नवी मुंबई, मुंब्रा-कळवा-घोडबंदर-बाळकुम या ठाणो महापालिकेतील परिसरासह मीरा-भाईंदरचा यात समावेश होता़ मात्र, मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर बेलापूर मतदारसंघ विखुरला गेला़ सध्या नवी मुंबई महापालिकेचे वाशीच्या जुहू नगरपासून तुर्भे, सानपाडा, नेरूळ-बेलापूर्पयतच्या परिसराचा या मतदारसंघात समावेश होतो़ एकीकडे झोपडपट्टीतील श्रमिक मतदार तर दुसरीकडे पामबीच रोडसह वाशी, एनआरआय वसाहतीत राहणारा उच्चशिक्षित गर्भश्रीमंत मतदाराचा या मतदारसंघात समावेश आह़े
1995 पासून नाईकांचे बेलापूर मतदारसंघासह नवी मुंबई महापालिकेवर एकहाती वर्चस्व राहिले आह़े पक्ष कोणताही असो महापालिकेत सत्तेची चावी मात्र नाईकांच्या हातात राहिली आह़े यात अपवाद 1999 च्या विधानसभा निवडणुकीचा़ त्यावेळी शिवसेनेच्या सीताराम भोईर यांनी नाईकांचा अनपेक्षित असा पराभव केला होता़ यात भोईर यांच्यापेक्षा स्व़ आनंद दिघेंचा करिश्मा जास्त होता़ पुनर्रचनेत बेलापूर मतदारसंघ युतीतील भाजपाच्या वाटय़ाला गेला़ 2क्क्9 मध्ये भाजपाने येथून सुप्रसिद्ध बिल्डर सुरेश हावरेंना उमेदवारी दिली़ त्यांनी नाईकांना अतिशय कडवी लढत दिली़ मनसेचे पप्पू महाले आणि
काँग्रेसचे नामदेव भगत यानी बंडखोरी केली नसती तर कदाचित नाईकांचा बेलापूर मतदारसंघात निसटता पराभव झाला.
गेल्या पाच वर्षात नाईकांनी बेलापूर मतदारसंघातील आमदार निधीतील कामांशिवाय मंत्री म्हणून केवळ बेलापूरच नव्हे तर नवी मुंबई महापालिका आणि सिडकोशी निगडित अनेक प्रश्नांचा पाठपुरावा केला आह़े बेलापूर विधानसभा क्षेत्रत नवी मुंबई महापालिकेतील 25 राष्ट्रवादीचे 25, शिवसेनेचे 8, काँग्रेेसचे 1क्, भाजपाचा एक आणि राष्ट्रवादीच्या तुर्भे स्टेअरच्या दोन नगरसेवकांचे वॉर्ड अर्धेअर्धे मोडतात़ मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील महत्त्वाचा घटक असलेले माथाडी कामगारांचे दोन्ही नेते नरेंद्र पाटील आणि शशिकांत शिंदे बेलापूर मतदारसंघाचे रहिवासी आहेत़ यातील शिंदे मंत्रिमंडळात आहेत़ राष्ट्रवादीचे असे एकहाती वर्चस्व असतानाही लोकसभेत येथून संजीव नाईक यांना 25 हजारांवर मतांची पिछाडी मिळाली़