शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

Ganesh Chaturthi 2018; लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी घेतले गणरायाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 12:05 IST

हिलटॉप येथील एकता गणेश मंडळाच्या श्री गणरायाचे सोमवारी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी दर्शन घेतले.

ठळक मुद्देनागपुरात राष्ट्रपती भवनाची प्रतिकृतीगणरायाला फुलेंची पगडीसर्वधर्मसमभाव अन् एकात्मतेची प्रेरणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशोत्सवात सर्वत्र आनंदी वातावरण असते. परंतु यासोबतच राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी. समाजात जातीय सलोखा वृद्धिंगत व्हावा, यासाठी सांस्कृतिक, धार्मिक व जनजागृतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विधायक कामही व्हावे या उद्देशाने गेल्या २८ वर्षापासून हिलटॉप, मुंजे बाबा आश्रम येथील एकता गणेश उत्सव मंडळाने बहुजन समाजातील युवकांनी आयएएस, आयपीएस अशा स्पर्धात्मक परीक्षेत सहभाग घ्यावा यासाठी ज्ञानमंदिर, विज्ञान मंदिरात गणेशाची स्थापना केली आहे. हिलटॉप येथील एकता गणेश मंडळाच्या श्री गणरायाचे सोमवारी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, आ. प्रकाश गजभिये, उद्योजक धर्मेंद्र आहुजा उपस्थित होते. मंडळातर्फे दरवर्षी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, सैन्यातील वरिष्ठ अधिकारी, रेल्वे अधिकारी यांच्या मुलाखती व प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. सोबतच रक्तदान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येते. विविध सामाजिक देखावे निर्माण केले जातात. सर्वधर्मसमभावाच्या संकल्पनेतून आंतरजातीय विवाहावर मान्यवरांच्या मार्गदर्शनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.यावर्षी हिलटॉप, मुंजे बाबा आश्रम येथे मंडळतर्फे भव्य १५१ फूट जागेत राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. इंडिया गेट व कुतूबमिनारची प्रतिकृ ती साकारली आहे. महात्मा फुले यांची पगडी घातलेली श्री गणेशाची मूर्ती स्थापित केली आहे.फुले-शाहू- आंबेडकरांचे विचार राष्ट्रपती भवनापर्यंत पोहचावे असा हेतू यामागे आहे. सोबतच लालबागच्या धर्तीवर स्थापित केलेल्या वेगवेगळ्या आठ मूर्ती आकर्षणाचे केंद्र ठरल्या आहेत. मंडळाला यापूर्वी सामाजिक देखाव्यासाठी राज्य सरकार, वृत्त वाहिन्याकडून प्रथम क्र मांकाचे पारितोषिक मिळालेले आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Vijay Dardaविजय दर्डाGanpati Festivalगणेशोत्सव