शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेट वापरासाठी सेना करणार गांधीगिरी

By admin | Updated: June 13, 2016 05:31 IST

बाईक चालविताना हेल्मेट वापरण्याचा संदेश देण्यासाठी सोमवारी ‘गांधीगिरी’ करण्याचा इशारा शिव वाहतूक सेनेने दिला आहे.

मुंबई : वाहतूक नियमांचे पालन आणि बाईक चालविताना हेल्मेट वापरण्याचा संदेश देण्यासाठी सोमवारी ‘गांधीगिरी’ करण्याचा इशारा शिव वाहतूक सेनेने दिला आहे. ‘सर बचाओ, घर बचाओ’ या नावाने वाहतूक सेना विशेष अभियान राबविणार असून, यात विनाहेल्मट प्रवास करणाऱ्यांना हेल्मेट भेट देण्यात येणार आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हे अभियान राबवण्यात येणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर आणि पुण्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे. यात वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जाईल. दिवसभरात पाच हजार हेल्मेट वाटण्याचे आम्ही ठरविले आहे, असे शिवसेना उपनेते व वाहतूक सेना अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी सांगितले. या अभियानांतर्गत सर्व प्रमुख रस्ते-चौकात प्रत्येकी २५ शिवसैनिकांचे एक पथक आम्ही तैनात करणार आहोत. पुढील तीन-चार महिने हे अभियान चालणार असून, त्या माध्यमातून वाहतूक नियम व सुरक्षेबाबत जनजागृती करण्याचा आमचा उद्देश आहे, असेही शेख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)