नाशिक : अपंगांसाठी राखीव असलेल्या तीन टक्के सेसचा निधी शंभर टक्के खर्च करण्याच्या मागणीसाठी बुधवारी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेतर्फे जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. आमदार बच्चू कडू यांच्यासह प्रहार अपंग कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या कक्षाचा ताबा घेतला. त्याची माहिती मिळताच उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी बनकर यांच्या कक्षाकडे धाव घेतली; मात्र आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याने त्यांनी तेथून काढता पाय घेत पोलिसांना माहिती दिली. बनकर यांनी कडू यांना सेसचा निधी शंभर टक्के खर्च करण्याचे तसेच इतर मागण्यांची पूर्तता करण्याचे आस्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (प्रतिनिधी)
अपंगांच्या प्रश्नावर गांधीगिरीने ‘प्रहार’
By admin | Updated: January 29, 2015 05:25 IST