शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखू खाणाऱ्यांना गांधीगिरीची शिक्षा

By admin | Updated: March 6, 2015 00:01 IST

मोटारीचा दरवाजा उघडून थुंकणाऱ्यांचा मोटार चालवण्याचा परवाना किमान महिनाभराकरिता रद्द केला जाईल, असे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले.

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी तंबाखू चघळताना, पिचकारी मारताना महापालिका अधिकारी अथवा पोलिसांनी पकडले तर यापुढे रस्ता साफ करण्याची, जवळील रुग्णालयात रुग्णसेवा करायची शिक्षा भोगण्याची तयारी ठेवावी लागेल. मोटारीचा दरवाजा उघडून थुंकणाऱ्यांचा मोटार चालवण्याचा परवाना किमान महिनाभराकरिता रद्द केला जाईल, असे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले. महात्मा गांधी यांच्या अहिंसात्मक अांदोलनाची कायम थट्टा करणाऱ्या शिवसेनेने तंबाखू चघळणाऱ्यांना वठणीवर आणण्याकरिता ‘गांधीगिरी’चा आधार घेतला आहे.डॉ. सावंत म्हणाले की, तंबाखू चघळणारे, खाऊन थुंकणारे यांना दंड आकारून वठणीवर आणता येणे अशक्य आहे. त्यांना लाज वाटेल असे काही करण्याची गरज आहे. विदेशात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना साफ करायला लावण्याची शिक्षा केली जाते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात तंबाखू खाऊन थुंकणाऱ्यांना रस्ता साफ करायला लावणे किंवा तंबाखू चघळताना पकडल्यास जवळील रुग्णालयात नेऊन तास-दीडतास रुग्णसेवा करायला लावण्यासारखी शिक्षा केली तर तंबाखू खाण्याचे प्रमाण बरेच कमी होईल, असा विश्वास वाटतो. राज्य सरकारच्या विधि व न्याय विभागाने हा प्रस्ताव कायद्याच्या चौकटीत बसवून द्यावा, असे सांगण्यात आले आहे. मोटारीचा दरवाजा उघडून रस्त्यावर थुंकण्याची सवय अनेक ठिकाणी पाहायला मिळते. अशा पिचकारी बहाद्दरांना धडा शिकवण्याकरिता त्यांचा वाहन चालवण्याचा परवाना रद्द करण्याचा विचार सुरु आहे. याबाबतचा प्रस्तावही विधि व न्याय विभाग तपासून पाहत आहे. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू चघळणे, थुंकणे यावर बंदी घालण्याची घोषणा सरकारने केल्यापासून राज्य मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांनी तंबाखू सोडली असून शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही आपली भेट घेऊन तंबाखू सोडल्याचे सांगितले, अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)