शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेडमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक

By admin | Updated: September 16, 2016 02:14 IST

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीवर गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता एका गटाकडून प्रचंड दगडफेक करण्यात आली.

उमरखेड (यवतमाळ) : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीवर गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता एका गटाकडून प्रचंड दगडफेक करण्यात आली. त्यात ५ पोलीस कर्मचाऱ्यांसह १६ जण जखमी झाले. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याला हवेत गोळीबार करावा लागला. त्यांनी पाच राऊंड फायर केल्याचे सांगण्यात येते. तांबोळीपुरा येथील छावा गणेश मंडळाची मिरवणूक नाग चौकाच्या वाटेवर आली असताना अचानक दगडफेक झाली. त्यामुळे गणेश मंडळाचे कार्यकर्ते, नागरिक व पोलिसांचाही गोंधळ उडाला. या दगडफेकीत राज्य राखीव पोलीस दलाचे जवान रवींद्र शेडवाने, पोलीस कर्मचारी प्रशांत वानखडे, देवीदास कांबळे, चक्रधर नरवाडे, राठोड यांच्यासह पांडुरंग गव्हाणे, संतोष गव्हाणे, रामभाऊ खंदारे, गणेश पाटील, राजेंद्र बोंगिनवार, कृष्णा सूर्यवंशी, अशोक शिमरे, संजय कदम, रवी टेकाळे, सावन भोकरे, गजानन नंदनवार आदी जखमी झाले. त्यांना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना नांदेडला रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळावर प्रचंड गोंधळ उडाला. नागरिकांची पळापळ झाली. व्यावसायिकांनी दुकाने बंद केली. बराचवेळ दगडफेक सुरू राहिल्याने पोलिसांनी सुरुवातीला लाठीचार्ज व नंतर गोळीबार केला. उमरखेड ठाण्यातील एका अधिकाऱ्याने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधील चार ते पाच राऊंड हवेत फायर केल्याचे प्रत्यक्षदर्शी पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, विसर्जनासाठी निघालेल्या अन्य गणेश मंडळांनी आधी दगडफेक करणाऱ्यांना अटक करा, नंतरच विसर्जन होईल, अशी भूमिका घेतल्याने तणाव वाढला. गणेश मंडळाच्या या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. जेथे दगडफेक झाली तो मिरवणुकीचा मुख्य मार्ग नसल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह उमरखेडकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात यवतमाळ, पुसद, वणी, दारव्हा, दिग्रससह अन्य भागात मात्र गणेश विसर्जन शांततेत सुरू होते. 

तर अकोला येथे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणेशभक्त धावत सुटल्याने एकच गोंधळ उडाला. गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यामुळे उडालेल्या धावपळीमुळे दोन चिमुकले किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. ही घटना रात्री ९ वाजताच्या सुमारास कोठडी बाजारनजीकच्या चौकात घडली. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही गणेशभक्त धावत जाण्याचा प्रयत्न करीत होते. पोलीस कर्मचारी त्यांना शांततेने जाण्यासाठी सांगत होते; परंतु गणेशभक्त ऐकत नव्हते. शेकडो गणेशभक्त अचानक धावत सुटल्याने गदीर्तील नागरिक घाबरून गेले आणि तेसुद्धा रस्त्याने पळायला लागले. चेंगराचेगरीची शक्यता असल्याने पोलिसांनी धावणाऱ्या काही गणेशभक्तांवर सौम्य लाठीमार करून त्यांना चौकाच्या बाहेर काढले. त्यामुळे उडालेल्या धावपळीत दोन चिमुकले किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले. या ठिकाणी तात्पुरता उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले.