शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

‘ट्रॅव्हल्स’चा प्रवाशांच्या जिवाशी खेळ

By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST

स्टेज परमिट नसतानाही खासगी ट्रॅव्हल्समधून सर्रास अवैध प्रवासी वाहतूक होत आहे.

सूर्यकांत वाघमारे,

नवी मुंबई- स्टेज परमिट नसतानाही खासगी ट्रॅव्हल्समधून सर्रास अवैध प्रवासी वाहतूक होत आहे. मुंबईतून अनेक जिल्ह्यांमध्ये या खासगी ट्रॅव्हल्सचे जाळे जोडले गेले आहे. कमाईच्या उद्देशाने क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसमध्ये कोंबले जात आहेत. त्यांच्याकडून प्रवाशांच्या जिवाशी खेळ होत असतानाही आरटीओचे कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे.मुंबई - पुणे या दोन शहरांचे अंतर कमी करण्यासाठी बनवलेला द्रुतगती महामार्ग मृत्यूचा सापळा बनू लागला आहे. वाहनचालकांकडून वेगमर्यादा तोडून लेनची शिस्तही पाळली जात नसल्यामुळे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. रविवारी घडलेल्या अपघातात निखील ट्रॅव्हल्सच्या खासगी बसमध्ये चालकासह ५० प्रवाशांची क्षमता असतानाही ६१ प्रवासी कोंबलेले होते. आसन व्यवस्थेनुसार जादा १० प्रवासी हे चालकाच्या केबिनमध्ये अथवा मोकळ्या जागेत बसवल्याची शक्यता आहे. त्यामुळे या अपघाताला ट्रॅव्हल्स मालकालाही तितकेच जबाबदार धरले जाण्याची शक्यता आहे.ही परिस्थिती बहुतांश खासगी ट्रॅव्हल्समध्ये पहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना मुंबईशी जोडणाऱ्या शेकडो ट्रॅव्हल्स सद्य:स्थितीला चालवल्या जात आहेत. त्यापैकी बहुतेक ट्रॅव्हल्स मालकांचे हात थेट मंत्रालयापर्यंत पोचलेले आहेत. खासगी ट्रॅव्हल्समुळे राज्य परिवहन मंडळाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. खासगी ट्रॅव्हल्सला केवळ समूहाचे बुकिंग असलेल्या प्रवाशांच्या पहिल्या टप्प्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंत वाहतुकीला परवानगी आहे. त्याव्यतिरिक्त तिकीट घेवून वैयक्तिक प्रवासी भरण्यास व जागोजागी थांबण्याची त्यांना परवानगी नाही. शासनाने हे अधिकार केवळ एसटीला दिले आहेत. त्यानंतरही मुंबई, नवी मुंबईसह राज्यभरात हे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. अवघ्या नवी मुंबईतच वाशी, सानपाडा, नेरूळ, सीबीडी, कळंबोली व पनवेल हे ट्रॅव्हल्सचे अवैध थांबे बनले आहेत. यानंतरही आरटीओने ठोस कारवाई केल्याचे अद्याप पहायला मिळालेले नाही. > मालकावर गुन्हा दाखल होणाररविवारी पहाटे द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातावेळी निखील ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. त्यानुसार नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ट्रॅव्हल्सच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे गुन्हे शाखा उपआयुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले. प्रवाशांना ट्रॅव्हल्सची भुरळएसटीपेक्षा कमी किमतीमध्ये शिवाय चित्रपट पाहत प्रवासाचे आमिष दाखवून खासगी ट्रॅव्हल्सकडे प्रवासी ओढले जातात. त्याकरिता आसन क्षमता संपल्यानंतरही जादा प्रवासी घेवून त्यांना चालकाच्या केबिनमध्ये बसवले जाते. या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सतत अपघाताच्या घटना घडत आहेत. यावरून दाखल झालेल्या याचिकेनुसार न्यायालयाने शासनासह संबंधित विभागांवर यापूर्वी ताशेरे देखील ओढलेले आहेत. त्यानंतरही परिस्थिती जशीच्या तशी असल्याचे पहायला मिळत आहे.