शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’मुळे थांबला खेळाडूंच्या जीवाशी खेळ

By admin | Updated: August 11, 2014 03:59 IST

दनलाल धिंग्रा मैदानातील चिखलात फुटबॉल स्पर्धेत खेळताना शालेय विद्यार्थी-खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यात अनेक मर्यादा येत होत्या

पिंपरी : मदनलाल धिंग्रा मैदानातील चिखलात फुटबॉल स्पर्धेत खेळताना शालेय विद्यार्थी-खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यात अनेक मर्यादा येत होत्या. चिखलात पाय घसरून किंवा अडकून खेळाडू जखमी होण्याचे प्रमाण वाढले होते. या प्रकारे खेळाडू जखमी होण्याचा धोका वाढला होता, या संदर्भात क्रीडा शिक्षकांनी तक्रार केल्यानंतर त्याची दखल घेत शहर आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.महापालिकेचे सहायक आयुक्त सुभाष माछरे, क्रीडाधिकारी रज्जाक पानसरे, पर्यवेक्षक सुभाष पवार, पुणे जिल्हा क्रीडा कार्यालयाचे जिल्हा क्रीडाधिकारी सुहास पाटील, क्रीडाधिकारी श्रीकांत हरनाळे यांच्याकडे तीव्र शब्दांत रोष व्यक्त करीत, तक्रार नोंदविली. त्याची दखल घेत शहर आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलांचे सामने शुक्रवारी थांबविण्यात आले. पाऊस थांबल्यानंतर हे सामने घेण्यात येणार आहेत. हरनाळे यांनी सांगितले की, मैदानात जास्त चिखल झाल्याच्या क्रीडाशिक्षकांच्या तक्रारी आल्यामुळे सामने थांबविण्यात आले आहेत. यासंदर्भात क्रीडाशिक्षक व फुटबॉल पंचांशी चर्चा केली. १५ आॅगस्टनंतर पाउस कमी झाल्यानंतर त्या पुन्हा घेतल्या जातील.’’क्रीडाकुलचे भगवान सोनवणे म्हणाले, ‘‘ यासंदर्भात माछरे व जिल्हा क्रीडाधिकारी सुहास पाटील यांच्याकडे तक्रार केली. चिखलात स्पर्धा घेऊन खेळाडूंच्या जीवाशी खेळू नये. तात्पुरता उपाय म्हणून खासगी शाळांच्या चांगल्या मैदानात स्पर्धा घ्याव्यात. पुढील वर्षांपर्यत यासंदर्भात कायमस्वरूपी तोडगा काढून फुटबॉलचे स्वतंत्र मैदान उभारावे.’’ पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय व महापालिकेतर्फे विविध खेळांची आंतरशालेय स्पर्धा दर वर्षी घेतली जाते. यात पाचवी ते बारावीचे हजारो विद्यार्थी-खेळाडू सहभागी होतात. यंदा एकूण ७२ खेळ प्रकाराच्या स्पर्धा आहेत. फुटबॉल खेळाला सर्वाधिक प्रतिसाद लाभतो. १४, १७ व १९ वर्षांखालील ६ गटांत ३०० पेक्षा अधिक संघ सहभागी होतात. ही स्पर्धा दोन ते अडीच महिने चालते. यंदा २२ जुलैपासून लढती येथे सुरू झाल्या. (प्रतिनिधी)