शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

गजाननचा झाला गजमल पुढारी!

By admin | Updated: May 15, 2016 05:21 IST

सामान्य शेतकरी, उपसरपंच आणि सरपंच असा प्रवास करीत गजानन उर्फ गजमल लक्ष्मण पाटील हा आरोग्यदूत बनला. मंत्रालयातील ओळखीने त्याला गजमल पुढारी बनविले.

मुक्ताईनगर (जि.जळगाव) : सामान्य शेतकरी, उपसरपंच आणि सरपंच असा प्रवास करीत गजानन उर्फ गजमल लक्ष्मण पाटील हा आरोग्यदूत बनला. मंत्रालयातील ओळखीने त्याला गजमल पुढारी बनविले. ३० कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली त्याला अटक झाल्याने त्याचे काळे कारनामे समोर आले आहेत. मेळसांगवे (ता. मुक्ताईनगर) येथील सामान्य शेतकरी असलेला गजाननची परिसरात गजाभाऊ उर्फ गजमल पुढारी म्हणून ओळख आहे. गेल्या वेळी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तो निवडून आला आणि त्याची उपसरपंचपदी वर्णी लागली. महिला सरपंच पायउतार झाल्याने काही दिवस त्याच्याकडे सरपंचपद होते. १५ वर्षांपूर्वी त्याने गरजू रुग्णांना मुंबई येथील रुग्णालयात दाखल करणे व त्यांना मदत करणे ही कामे सुरू केली. हळूहळू आरोग्यदूत म्हणून गजमलची ओळख रूढ झाली. गरजूंना समाजसेवी संस्थाकडून मदत मिळवून देण्याचे काम सुरू झाले, त्यातून त्याचा जनसंपर्क वाढत गेला. चार ते पाच महिन्यांपासून गजमल चारचाकीमध्ये फिरू लागला. या वाहनावर विधिमंडळ इमारतीचे स्टिकर लावण्यात आले आहे. त्यामुळे वाहनात आमदार आहेत की काय? असा भास लोकांना होत असतो.गजमलच्या मुलाचे २८ फेब्रुवारीला लग्न झाले. हळदीच्या कार्यक्रमात शुुद्ध तुपात बनविलेल्या पदार्थांचा समावेश होता, त्याची तालुक्यात मोठी चर्चा झाली होती. शहापूर (म.प्र.) येथे झालेल्या मुुलाच्या लग्न समारंभाला मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. गजमल वापरत असलेले चारचाकी वाहन एका आमदाराने भेट दिल्याची चर्चा परिसरात आहे. (प्रतिनिधी) रामरोटी आश्रमाचाही आधारगजमल याने बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीवर पाच वर्ष संचालक म्हणून काम केले आहे. रुग्ण सेवेपाठोपाठ रामभाऊ पुजारी महाराज सेवाभावी ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम करताना रामरोटी आश्रम तो चालवत आहे. त्यातून आध्यात्मिक कार्याची ओळख त्याने निर्माण केली. ‘ओएसडी’देखील मुक्ताईनगरचे?३० कोटी लाच मागितल्याप्रकरणातील आरोपी मंत्रालयातील ज्या अधिकाऱ्याकडून काम करवून घेण्याचे सांगत होता, ते ‘ओएसडी’देखील मूळ मुक्ताईनगर येथील असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. त्यांनी जळगाव जिल्ह्यात प्रांताधिकारी म्हणून काम केले आहे. विरोधकांचे षड्यंत्र- एकनाथ खडसेमाझ्या मुंबई किंवा जळगाव येथील कार्यालयामध्ये गजानन पाटील अथवा गजमल पाटील नावाची व्यक्ती अधिकृतपणे अथवा खासगीत कोणत्याही पदावर कार्यरत नाही. त्यामुळे माझ्या नावाचा कोणी गैरवापर करीत असेल व ती व्यक्ती दोषी असेल तर कठोर कारवाई करण्यात येईल, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुणे येथे सांगितले.