शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोच्या श्रेयात गायकवाडांची उडी

By admin | Updated: November 2, 2016 03:26 IST

डोंबिवली मेट्रोच्या श्रेयावरून वाद रंगलेला असताना कल्याण पूर्वेतील अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनीही त्यात उडी घेतली

कल्याण : कल्याणहून भिवंडीमार्गे ठाण्याला जाणाऱ्या मेट्रोचा सध्याचा मार्ग निम्म्याहून ्धिक कल्याणसाठी गैरसोयीचा आहे. त्यामुळे तो बदलण्याची मागणी शिवसेना नेते रवी पाटील यांनी केली आहे. एपीएमसीतून आग्रा रोडमार्गे दुर्गाडीला जाण्याऐवजी रेल्वे स्टेशन, मुरबाड रोड, बिर्ला कॉलेज, दुर्गाडीमार्गे ही रेल्वे भिवंडीला नेल्यास मोठ्या लोकसंख्येला तिचा उपयोग होईल, अशी मागणी त्यांनी केली आहे. याच मार्गावरून शीळ-भिवंडी उड्डाणरस्ता जाणार आहे. त्यामुळे वाहतुकीच्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.सध्याचा मार्ग चुकीचा असल्याने मेट्रोचा भिवंडीला जितका फायदा होईल, तितका कल्याणला होणार नाही. त्यामुळे प्राथमिक अवस्थेतच हा मार्ग दुरूस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे. नव्या मार्गाचा फायदा भवानी चौक, बिर्ला गेट, खडकपाडा, आधारवाडी या भागाला होईल. शहाडला राहणाऱ्यांनाही मेट्रोचा दिलासा मिळेल. त्यामुळे मेट्रोचा मार्ग बदलण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएचे आयुक्त यू. पी. एस. मदान यांना देण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. मेट्रोच्या श्रेयाच्या वादात शिवसेनेने भाजपावर कुरघोडीचा प्रयत्न चालवला असतानाच हा मार्गबदलाचा मुद्दा समोर आला आहे. (प्रतिनिधी)>कोंडी आणखी काही वर्षेमेट्रोमुळे भविष्यात वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असली, तरी तो मार्ग पूर्ण होईपर्यंत मात्र नागरिकांना रस्त्यांतील रेल्वेच्या कामामुळे किमान चार ते पाच वर्षे कोंडीचा सामना करावा लागणार आहे. शीळ ते भिवंडी मार्गावरून जाणारा उड्डाणपूल, कल्याण-शीळ आणि कल्याण-भिवंडी मेट्रोमुळे शहरातील रस्ते खोदले जातील. त्यामुळे हे सर्व प्रकल्प सुरू होऊन प्रत्यक्षात येईपर्यंत वेगवेगळ््या मार्गाने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. अंबरनाथ, बदलापूरला टाटा : २०१४ च्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरपर्यंत मेट्रो आणली जाईल, असे आश्वासन दिले होते. आघाडीने केवळ मेट्रोचे स्वप्न दाखविले. ते भाजप सरकारने पूर्णत्वास नेल्याचे भाजपचे म्हणणे आहे. मात्र युती सरकारनेही मेट्रो कल्याणला आणली, पण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरमधील नागरिकांचा भ्रमनिरास केल्याची टीका सुरू झाली आहे.