शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणीच्या घटनेला गायकवाडच जबाबदार

By admin | Updated: April 19, 2017 02:58 IST

राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या इशा-यावरुन त्यांच्या सुरक्षारक्षकांनी अगोदर

मुंबई : राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या इशा-यावरुन त्यांच्या सुरक्षारक्षकांनी अगोदर आमच्या कार्यकर्त्यांवर हात उचलला आणि त्यातून मारहाणीची घटना घडली, असा दावा भारिप बहुजन महासंघाचे सरचिटणिस ज. वि. पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.औरंगाबादमध्ये सुभेदारी, या शासकीय विश्रामगृहाच्या आवारात गायकवाड यांना सोमवारी मारहाण झाली. याप्रकरणी भारिपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक झाली. या घटनेबाबत पवार यांनी पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आम्ही हिंसेचे समर्थन करणार नाही. आमचे कार्यकर्ते चुकीच्या पद्धतीने वागले असतील, तर आम्ही त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करू. पण या घटनेमागची वस्तुस्थिती वेगळी आहे. आमचे कार्यकर्ते सुभेदारीवर एका बैठकीसाठी जमले असताना सुरक्षारक्षकांनी त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. त्यातून बाचाबाची झाली. सुरक्षारक्षकांनी कार्यकर्त्यांवर हात उचलला, असा दावा पवार यांनी केला. कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. गायकवाड आणि त्यांच्या सुरक्षारक्षकांविरूद्ध तक्रार केली आहे, असेही पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सहा जणांना पोलीस कोठडीऔरंगाबाद : राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ यांच्यासह ६ जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. एच. मोहंमद यांनी २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली. दोन महिलांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.सोमवारी सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये भारिप-बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील आंबेडकर भवन पाडल्याच्या कारणावरून रत्नाकर गायकवाड यांच्यावर हल्ला करत त्यांना जबर मारहाण केली होती. पोलिसांनी अमित भुईगळ (३८), दिनेश सांडूजी साळवे (३९), गौतम नामदेव गवळी (४७), संदीप जिजा वाघमारे (२८), श्रीरंग पांडुरंग ससाणे (५१) आणि प्रदीप छगन इंगळे (२५) यांच्यासह दोन महिला अशा ८ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)