शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गायकवाड मुंबईऐवजी उतरले वापीलाच!

By admin | Updated: March 26, 2017 03:38 IST

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर सर्व विमान

वापी/ नवी दिल्ली : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर सर्व विमान कंपन्यांनी बंदी घातल्यामुळे ते शुक्रवारी आॅगस्ट क्रांती एक्स्प्रेसने मुंबईला यायला निघाले खरे; पण मुंबईला येण्याऐवजी त्यांनी वापीला उतरून उस्मानाबादचा रस्ता धरला. ते मुंबईत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार होते. पण ती भेटही कधी होणार, हे अनिश्चित आहे. ठाकरे यांनी भेटीसाठी त्यांना वेळ न दिल्याची चर्चा मुंबईत सुरू होती.प्रसिद्धी माध्यमांचा ससेमिरा टाळण्यासाठीच ते वापीला उतरून उस्मानाबादला निघून गेले, असे सांगण्यात येत आहे. त्यांनी वापी येथे कार मागवून घेतली होती. त्यांच्यासोबत त्यांचे दोन कार्यकर्तेही होते, असे सांगण्यात आले. त्यांनी दिल्ली ते मुंबई टू टायर एसीची तीन तिकिटे आरक्षित केली होती. त्याआधी मथुरा स्थानकावर ते ट्रेनमधून खाली उतरले होते. सोबतच्या कार्यकर्त्याच्या छातीत दुखू लागल्याने आॅगस्ट क्रांती एक्स्प्रेस काही काळ  मथुरा स्थानकावर थांबवण्यात आली  होती. रेल्वेत पत्रकारांशी बोलण्यास  त्यांनी नकार दिला. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराशी त्यांची बाचाबाची झाली,  असे कळते. खा. गायकवाड यांच्यावर देशातील सर्वच विमान कंपन्यांनी बंदी घातली आहे. पुढील आठवड्यात लोकसभेत या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, एअर इंडिया आणि ज्यांना मारहाण झाली ते सुकुमार यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी कलम ३0८ व (कलम ३५५ अन्वये खा. गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून, तपास क्राइम ब्रँचकडे सोपविला आहे. (वृत्तसंस्था)गायकवाड  यांचे पत्रखा. गायकवाड यांनी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन व नागरी वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांना पत्र लिहून एअर इंडियाच्या सेवेबद्दल तक्रारी केल्या असून, झाल्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी पत्रात केली आहे. एअर इंडियाची  देशांतर्गत सेवा अतिशय वाईट असून, कर्मचारीवर्गही अत्यंत उद्धटपणे वागतो, असा आरोप त्यांनी केला आहे. वाईट सेवा दिल्यास खासगी कंपन्यांवर कारवाई केली जाते.  मग एअर इंडिया  कंपनीवर कारवाई का नाही, असा सवालही त्यांनी केला आहे.