शहरं
Join us  
Trending Stories
1
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
2
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
3
मुख्यमंत्र नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
4
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
5
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
6
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
7
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
8
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
9
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल
10
अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना
11
आईच्या अपमानाचा बदला! दहा वर्षे घेतला आरोपीचा शोध, समोर येताच केले ठार; सोशल मीडिया पोस्टमुळे सापडले
12
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
13
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
14
IND vs ENG : इंग्लंडनं खेळली टीम इंडियासारखी 'चाल'; कसोटी क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
15
"मी लघवी स्वत:च प्यायलो, त्यांना दिली नाही म्हणून...", ट्रोल करणाऱ्यांना परेश रावल यांची सणसणीत चपराक
16
'सैय्यारा'से आशिकी हो गयी है मुझे! 'आशिकी गर्ल' श्रद्धा कपूरने सिनेमा पाहून दिली प्रतिक्रिया
17
हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप
18
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
19
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
20
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?

गायकवाडांना विमानबंदी!

By admin | Updated: March 25, 2017 02:58 IST

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला गुरुवारी सँडलने मारहाण करणारे शिवसेनेचे खा. रवींद्र गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यासाठी एअर इंडिया तसेच चार खासगी कंपन्यांनी बंदी घातली आहे.

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला गुरुवारी सँडलने मारहाण करणारे शिवसेनेचे खा. रवींद्र गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यासाठी एअर इंडिया तसेच चार खासगी कंपन्यांनी बंदी घातली आहे. फेडरेशन आॅफ इंडियन एअरलाइन्सच्या सूत्रांनी ही माहिती दिली. ही बंदी उठेपर्यंत खा. गायकवाड यांना विमानाने प्रवासच करता येणार नाही. एअर इंडियाने त्यांचे आज शुक्रवारचे दिल्ली ते पुणे हे परतीचे तिकीटच रद्द केले.कोणत्याच कंपनीच्या विमानाने परतणे शक्य नाही, हे लक्षात आल्यानंतर खा. गायकवाड यांनी दिल्ल्ीहून रेल्वेने मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. ते शनिवारी सकाळी मुंबईत पोहोचल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. खा. गायकवाड यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी मारहाणीचा गुन्हाही दाखल केला आहे. एअर इंडिया आणि संबंधित कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर हा एफआयआर दाखल करण्यात आला.शिवसेनेचे नेते कालपासून आज सकाळपर्यंत खा. गायकवाड  यांनी चूक केल्याचे मान्य करीत होते. मात्र त्यांच्याविरुद्ध एआयआर दाखल होताच, शिवसेनेने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीुमुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप सुरू केला आहे. एवढेच नव्हे, तर पोलिसांनी मला अटक करून दाखवावीच, असा इशारा गायकवाड यांनी दिला. मी माफी मागणार नाही. त्या कर्मचाऱ्याने आधी माफी मागावी. नंतर काय ते पाहू, असे सांगून माझ्याबाबतील शिवसेना पक्षप्रमुखच योग्य तो निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.दिल्लीहून आज दुपारी गायकवाड पुण्याला येणार होते. पण त्यांचे परतीचे तिकीट रद्द करण्याचा निर्णय एअर इंडियाने रद्द केले. एअर इंडिया या सरकारी कंपनीने आणि जेट एअरवेज, इंडिगो, स्पाईस जेट आणि गो एअर या चार खासगी विमान कंपन्यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती फेडरेशन आॅफ इंडियन एअरलाइन्सच्या सूत्रांनी दिली. इंडिगोचे संचालक आदित्य घोष म्हणाले की, या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे. शिवसेनेचे सचिव खा. अनिल देसाई यांनी सांगितले की, आपल्या प्रवासाच्या नियोजनात बदल करण्याबाबत गायकवाड यांना सांगण्यात आले आहे. हा तणाव वाढू नये, अशी पक्षाची इच्छा आहे. गायकवाड यांनी शुक्रवारचे एअर इंडियाचे (एआय ८४९) दुपारी चारचे तिकीट काढले होते. गायकवाड यांना विमानात प्रवेश मिळणार नाही, असे एअर इंडियाने त्यांना कळविले.तक्रार आल्यास तपशील पाहूमात्र त्यांच्या वर्तणुकीबाबत लोकसभेत आज चर्चा झाली नाही. लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना कालच्या घटनेविषयी विचारले असता, त्या म्हणाल्या की,ही घटना संसदेच्या बाहेर घडलेली असल्याने सभागृह याची स्वत:हून दखल घेऊ शकत नाही. कोणाची तक्रार आल्यास तपशील घेऊन नंतर पाहू.लोकसभा अध्यक्षांकडे तक्रारगायकवाड यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, नागरी उड्डयन मंत्री यांनी पत्र लिहिले आहे. याशिवाय या घटनेची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही दिल्याचे समजते.सभ्यतेची अपेक्षासफाई कर्मचाऱ्यांना विमानाची साफसफाई करायची होती. त्यामुळे त्यांनी (गायकवाड) विमानातून खाली उतरावे, एवढेच मी त्यांना सांगितले. लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी सभ्यतेने वागायला हवे, असे मारहाण झालेला एअर इंडियाचा कर्मचारी सुकुमार यांनी सांगितले.खासदाराच्या मुजोरीचा व्हिडिओया घटनेचा एक कथित व्हिडिओ गुरुवारी रात्री समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला. त्यात एअर इंडियाची एक महिला कर्मचारी सहकाऱ्याला मारणे थांबवावे, अशी खासदार गायकवाड यांना विनंती करताना दिसते. यावर गायकवाड ज्याला मारतअसतात त्याला विमानाबाहेर फेकून देण्याची भाषा करतात. असे केले तर तो कर्मचारी मरेल व तुमच्यावर खुनाचा खटला होईल, असे कर्मचारी त्यांना सांगतात. त्यावर गायकवाड, याआधी माझ्यावर अनेक खटले आहेत, आणखी एक झाल्याने काही फरक पडत नाही, अशी बढाई मारत असल्याचेही या व्हिडिओत दिसते.