मुंबई : बाहेरून येणाऱ्या लोकांमुळेच मुंबईत घाण होत असल्याची मुक्ताफळे सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी स्थायी समितीच्या बैठकीत आज उधळली़ यावर विरोधी पक्षांना कडाडून विरोध केल्यानंतरही विश्वासराव यांनी आपले भाषण सुरूच ठेवले़ओला व सुका कचरा वेगळा करण्याची मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वच हौसिंग सोसायट्यांना स्वतंत्र कचऱ्याचे डबे द्यावे, अशी मागणी भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केली होती़ मात्र यावर प्रशासनाने दिलेले स्पष्टीकरण अमान्य करीत सर्वपक्षीय सदस्यांनी जोरदार हल्लबोल केला़ परंतु सभागृह नेत्या यांनी बाहेरून मुंबईत आलेले लोक घाण करीत आहेत़ पूर्वी एक मजली असलेल्या झोपड्या आता तीन मजली झाल्या आहेत़ त्यामुळेच मुंबईत अस्वच्छता वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला़ या विधानाचा समाजवादीचे गटनेते रईस शेख आणि काँग्रेसचे प्रवीण छेडा यांनी तीव्र निषेध केला़ (प्रतिनिधी)
मुंबईबाहेरच्या लोकांमुळे घाण विश्वासराव यांचे वक्तव्य
By admin | Updated: December 25, 2014 02:53 IST