शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरच्या सुपुत्रांची गगन भरारी

By admin | Updated: May 10, 2016 20:09 IST

यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम आलेला विद्यार्थी योगेश विजय कुंबेजकर हा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या

 ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 10- केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीची परीक्षा तशी खूपच अवघड. या परीक्षेला हजारो विद्यार्थी बसतात. मात्र पास हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच होतात. यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम आलेला विद्यार्थी योगेश विजय कुंबेजकर हा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या कुंभेजला वास्तव्याला आहे. योगेश कुंभेजकर याचे १ ली ते ४ थीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण सोलापूरच्या नुमवि प्रशालेत झाले.  त्यानंतर त्याचे ५ ते १० पर्यंतचे शिक्षण हरिभाई देवकरण प्रशाला, सोलापूर येथे झाले. ११ आणि १२ वीचे शिक्षण पुणे येथील एस पी कॉलेज येथे झाले. १२वी नंतर आयआयटी पवई येथे इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचा कोर्स पूर्ण केला. याचवेळी जिल्हा बँकेत एका वरिष्ठ अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आल्याने योगेश याने डीसीसी बँकेत ६ महिने नोकरी केली़. याचवेळी आपल्याला आयआयएस व्हायचे हे ठरवून त्यांनी पुन्हा अभ्यासास सुरुवात केली़. २ वर्ष त्याने अथक परिश्रम घेऊन अभ्यास केला. यूपीएससीच्या पहिल्या वर्षी परीक्षा देऊन मुलाखत दिली़. त्यात योगेशला १४३ वी श्रेणी मिळाली होती़. त्यानंतर हैदराबाद येथे ट्रेनिंग घेतले. ६ मे रोजी झालेल्या मुलाखतीचा आज निकाल लागला. यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून दुसरा आलेला विद्यार्थी हणमंत कोंडिबा झेंडगे हा देखील सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यातील भांबेवाडीतला रहिवासी आहे. तो महाराष्ट्रातून दुसरा तर देशातून 50 वा क्रमांक पटकावून यशस्वी झाला आहे. एकंदरीतच सोलापुरातल्या या सुपुत्रांनी स्वतःच्या उल्लेखनीय यशामुळे महाराष्ट्राची मान देशासमोर उंचावली आहे.