शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

गडकरींच्या प्लॅनला ‘पीडब्ल्यूडी’चा सुरुंग!

By admin | Updated: September 27, 2016 02:16 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मराठवाड्यासाठी घोषित केलेल्या १८ हजार कोटींच्या रस्ते विकास प्लॅनला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरूंग लागण्याची शक्यता आहे.

- विकास राऊत, औरंगाबाद

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मराठवाड्यासाठी घोषित केलेल्या १८ हजार कोटींच्या रस्ते विकास प्लॅनला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरूंग लागण्याची शक्यता आहे. हा प्लॅन १० महिन्यांपासून कागदावर आहे. चौपदरीकरणासाठी नियोजित केलेल्या रस्त्यांवर १० हजारांहून कमी वाहने धावत असल्याचा अहवाल तयार करून ते रस्ते पीडब्ल्यूडीकडे वर्ग करून निधी लाटण्याची शक्तता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) वरिष्ठ सूत्रांनी वर्तविली आहे. गडकरी यांच्या उपस्थितीत २५ डिसेंबर २०१५ रोजी १८ हजार कोटींच्या गोल्डन ट्रँगल कामांची घोषणा झाल्यानंतर या कामांचे भूमिपूजन देखील झाले होते. १० महिन्यांत घोषित केलेल्या विविध योजनांचा डीपीआर अथवा प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही.एनएचएआयच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, पीडब्ल्यूडीकडे भूसंपादनासाठी निधी उपलब्ध नाही. डीपीआरचे काम पीडब्ल्यूडी, राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) देण्यात आले आहे. जड वाहनांची वाहतूक जास्त असेल तर चौपदरी रस्ते होणे अपेक्षित आहे. परंतु अशी वाहतूक कमी प्रमाणात असल्याचे अहवाल समोर आले आहेत. गडकरींच्या घोषणेतील बहुतांश रस्ते दुपदरी होण्याची शक्यता आहे. पीडब्ल्यूडी विभागातील अभियंत्यांना बदली होण्यापूर्वी या रस्त्यांच्या निविदा मंजूर करण्यात जास्त रस असल्याने अनेक रस्ते द्विपरीकरणात वर्ग होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. घोषणांचा भूलभुलैया औरंगाबाद-फुलंब्रीमार्गे सिल्लोड -पहूर ते जळगाव हा १५५ किमीचा रस्ता १५५० कोटींतून तर, औरंगाबाद -सिल्लोड -अजिंठा ते पहूरमार्गे जामनेर -मुक्ताईनगर हा ४०१ किमीचा रस्ता ४ हजार १० कोटींतून होईल, असे सांगण्यात आले. औरंगाबाद -वैजापूर-नाशिक १८३ किमीचा रस्ता १८३० कोटींतून आणि औरंगाबाद -वैजापूर-कोपरगावमार्गे शिर्डी हा १५० किमीचा रस्ता १५०० कोटींतून तर, औरंगाबाद ते परभणी हा १२५ किमीचा रस्ता १२५० कोटींचा होईल, असे जाहीर करण्यात आले, पण यातील एकही काम प्रत्यक्षात सुरू झाले नाही.