शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींचा ओएसडी म्हणवून घेणारा वाघाडे पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 10:46 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांचा ओएसडी म्हणवून घेणारा ठगबाज जिसस वाघाडे याची सोनेगाव पोलिसांनी पुन्हा कसून चौकशी केली. 

नागपूर, दि. 6 - केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांचा ओएसडी म्हणवून घेणारा ठगबाज जिसस वाघाडे याची सोनेगाव पोलिसांनी पुन्हा कसून चौकशी केली. 

ओंकारनगरातील रहिवासी असलेल्या वाघाडे याने  शासकीय मुद्रा असलेले व्हिजिटिंग कार्ड छापले होते. या कार्डचा वापर करून तो आपण केंद्रीय मंत्री  गडकरी यांचा ओएसडी असल्याचे इतरांना सांगत होता. विमानतळ आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणी तो या कार्डचा सर्रासपणे वापर करीत होता. नागपूर विमानतळावर 31 जुलै रोजी सकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान त्याने अशाच प्रकारे आपले बनावट व्हिजिटिंग कार्ड देऊन तेथील लाऊंजमध्ये आदरातिथ्य घेतले. याचवेळी  गडकरी यांचे अतिरिक्त खासगी सचिव अतुल मंडलेकर हे  नागपूर विमानतळावरील गो-एअरवेजच्या काऊंटरवर बोर्डिंग पास घेत होते. त्यावेळी तेथील अधिका-यांनी मंडलेकर यांच्याकडे वाघाडेबाबत विचारपूस केली. त्याने दिलेले व्हिजिटिंग कार्डही गो-एअरवेजच्या अधिका-यांनी मंडलेकरांना दाखवले. ते पाहून मंडलेकर यांनी वाघाडेला हे तुमचेच कार्ड आहे का, अशी विचारणा केली आणि वाघाडेची बनवाबनवी उघड झाली. त्यावेळी त्याने चुकीबद्दल क्षमायाचना केली आणि परीक्षेसाठी मुंबईला जायचे आहे, असे सांगितले. त्यामुळे त्याला त्यावेळी जाऊ देण्यात आले.शुक्रवारी या प्रकरणी गडकरींचे ओएसडी सुधीर देऊळगावकर यांनी सोनेगाव ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर जिसस वाघाडे याची पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे यांनी चौकशी सुरू केली. त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर त्याने व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते म्हणून आपण व्हिजीटिंग कार्ड छापल्याची कबुली दिली. शुक्रवारी रात्र झाल्यामुळे  पुन्हा चौकशीसाठी शनिवारी हजर राहण्याचे सूचना पत्र देऊन पोलिसांनी त्याला मोकळे केले. शनिवारी दुपारपासून पोलिसांनी त्याची पुन्हा चौकशी सुरू केली. त्याच्याशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे  त्याच्याकडून मागवून घेतली. व्हिजिटिंग कार्ड छापणा-याचीही पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर त्याला पुन्हा रविवारी चौकशीसाठी येण्यास सांगण्यात आले. रविवारी रात्रीपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याचे संकेत आहे.