शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

नदीतून काढला गडकरींचा पुतळा!

By admin | Updated: January 5, 2017 05:15 IST

भाषाप्रभू, ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा पोलिसांनी बुधवारी दुपारी मुठा नदीपात्रातून शोधून काढला

पुणे : भाषाप्रभू, ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा पोलिसांनी बुधवारी दुपारी मुठा नदीपात्रातून शोधून काढला. संभाजी उद्यानातील हा अर्धपुतळा उखडून संभाजी ब्रिगेडच्या चार कार्यकर्त्यांनी तो नदीत फेकून दिला होता. या चौघांनाही ६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘‘ज्यांनी हे कृत्य केले ते आता सापडले आहेत, त्यांची गय केली जाणार नाही परंतु यांचे बोलविते धनी कोण आहेत याची पाळेमुळे खोदून काढली जातील. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या नावे असे उद्योग खपवून घेतले जाणार नाहीत,’’ असा सज्जड इशारा दिला आहे.गडकरी यांचा पुतळा मंगळवारी मध्यरात्री संभाजी उद्यानातून काढून नदीपात्रात फेकून दिल्याचा मेसेज व्हायरल झाला होता. त्यानुसार चौघा आरोपींना घेऊन पोलीस दुपारी नदीपात्रात आले. त्यांनी जागा दाखविल्यानंतर पाण्यात उतरून काही वेळात हा पुतळा शोधून काढला. पुतळ्यावर हातोड्याने प्रहार केले असले तरी पुतळा भंगलेला नाही, सध्या पुतळा पोलिसांच्या ताब्यात असून महापालिकेला हवा असल्यास त्यांना न्यायालयाकडे अर्ज करावा लागेल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कदम यांनी सांगितले. या घटनेमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घ्यायचा असल्याने चारही आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी मुख्य सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी न्यायालयात केली़ त्यानुसार प्रदीप भानुदास कणसे, हर्षवर्धन महादेव मगदूम, स्वप्निल सूर्यकांत काळे आणि गणेश देविदास कारले यांना न्यायालयाने ६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आरोपीच्या वतीने अ‍ॅड़ मिलिंद पवार, अ‍ॅड़ रविराज पवार, अ‍ॅड़ सुहास फराडे, अ‍ॅड़ विजय शिंदे, अ‍ॅड़ विश्वजित पाटील यांनी काम पाहिले़