शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

उद्धवच्या मनधरणीसाठी गडकरी धावले

By admin | Updated: February 28, 2015 05:25 IST

केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकाला असलेला विरोध शिवसेनेने मागे घ्यावा, यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी

मुंबई : केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकाला असलेला विरोध शिवसेनेने मागे घ्यावा, यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी केली. तसेच शिवसेना व भाजपामध्ये इतर मुद्यांवरून निर्माण झालेला तणाव निवळावा, यादृष्टीनेही चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे समाधान करण्याची जबाबदारीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोपवली असल्याचे गडकरी यांनी सांगितले. भूसंपादन विधेयक मार्गी लावण्याकरिता पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा अधिवेशनाच्या तोंडावर बारामतीत येऊन पायधूळ झाडली व शरद पवार यांच्यावर स्तूतीसुमने उधळली. पण शिवसेना सत्तेत सहभागी असतानाही विरोध करीत आहे. केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत आहे. रेल्वे अर्थसंकल्पावरही सेनेने सडकून टीका केली. मुंबई महापालिकेचा विकास आराखडा, एफएसआय, चौपाटीवरचे एलईडी बल्ब आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या, अशा नानाविध कारणांवरून भाजपाला धारेवर धरण्याची एकही संधी शिवसेना सध्या सोडत नाही. कट्टर विरोधकांपेक्षाही सेनेसारख्या मित्रपक्षाकडून होणाऱ्या या टिकेमुळे भाजपाची कोंडी होत आहे. त्यामुळे मोदींना गडकरी यांना संकटमोचक म्हणून धाडावे लागले आहे. मात्र गडकरी भेटीनंतर सेनेने याबाबतची आपली भूमिका रात्री उशिरापर्यंत स्पष्ट केली नाही.