अकोला : अकोल्यातील कार्यक्रम आटोपून नागपूरकडे रवाना होत असताना पावसाचा व्यत्यय आल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना हेलिकॉप्टरऐवजी कारनेच प्रवास करावा लागला. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील एका विद्यामंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम शनिवारी पार पडला. त्या वेळी अकोल्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. भूमिपूजन कार्यक्रमातही त्यामुळे व्यत्यय आला. कार्यक्रमानंतर ते हेलिकॉप्टरने नागपूरला जाणार होते; मात्र अकोल्यात व नागपूरला जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने हेलिकॉप्टर उडविण्यास असमर्थता दर्शविल्याने ते कारनेच नागपूरला रवाना झाले.
हेलिकॉप्टरऐवजी गडकरींचा कारने प्रवास!
By admin | Updated: June 14, 2015 01:54 IST