शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अपंग चिमुकलीच्या मदतीला धावून आले गडकरी!

By admin | Updated: January 22, 2015 00:45 IST

‘लोकमत’ने फोडली होती वाचा : नाशिकच्या अनाथश्रमात होणार सांभाळ.

अनिल गवई / खामगाव (जि. बुलडाणा):आईने लाथाडले, अनाथालयांनी झिडकारल्याचे समजताच अपंग चिमुकलीच्या मदतीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धावून आले. त्यांनी चिमुकलीची वणवण थांबवून तिला अनाथाश्रमात सांभाळण्याचे पत्र पुणे येथील महिला व बाल विकास आयुक्तालयाला पाठविले. दरम्यान, सदर चिमुकलीस सांभाळण्याची जबाबदारी नाशिक जिल्ह्यातील अनाथालयाने स्वीकारली आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून लोकमतने या अपंग चिमुकलीची वणवण १८ जानेवारीला प्रकाशित केली होती, हे येथे उल्लेखनीय आहे.शुक्रवार, ९ जानेवारी रोजी शेगाव येथे एका निर्दयी मातेने अपंग असलेल्या या चिमुरडीस सोडून दिले होते. शेगाव पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि तेथील सामान्य रुग्णालयात तिच्यावर प्रथमोपचार केले. त्यानंतर तिला बुलडाणा जिल्हा बाल कल्याण समितीकडे सुपूर्द केले. समितीने सुरुवातीला नागपूर येथील अनाथालयात सोपविण्यासाठी शेगाव पोलिसांना पत्र दिले, मात्र बुलडाणा शहरातच दोन अनाथालये असल्याची तसेच ती अपंग असल्याची सबब पुढे करून नागपूर येथील अनाथालयांच्या संचालकांनी तिच्या संगोपनास नकार दिला. त्यामुळे निराश होऊन परतलेल्या शेगाव पोलिसांनी तिला पुन्हा बाल कल्याण समितीकडे आणले. समितीने बुलडाणा येथील दोन्ही अनाथालयांना पत्र दिले, मात्र पुन्हा चिमुकलीचे अपंगत्व आडवे आले. अनाथालयांनी तिला स्वीकारण्यास नकार दिला. दरम्यान, नाही नाही करीत बाल कल्याण समितीने शुक्रवार, १६ जानेवारी रोजी तिचे तात्पुरते पालकत्व स्वीकारले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिला बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्याच्या बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष मंगला सपकाळ यांनी चिमुकलीला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी त्या प्रयत्नरत असल्याचे त्यांनी सांगीतले. नाशिक येथील अनाथलयाशी दूरध्वनीहून बोलणे झाले आहे. या संदर्भात लवकरच निर्णय घेऊन शेगाव पोलिसांना पत्र दिले जाईल. त्यानंतर या चिमुकलीच्या सुपूर्दतेचा मार्ग मोकळा होईल, असे त्या म्हणाल्या. *नाशिक येथील अनाथालयाने दर्शविली संगोपनाची तयारीत्या चिमुकलीचे संगोपन करण्यास नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील खंबाळे येथील श्रीमती गारडा अनाथ बालकाश्रमाने तयारी दर्शविली आहे. या मुलीला आश्रमात आणावे, अशी विनंतीही त्यांनी शेगाव पोलिसांकडे केली आहे. *केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची तत्परता!अपंगत्वामुळे राज्यातील अनाथालये संगोपनास नकार देत असल्याची बाब लोकमतसह एका सामाजिक कार्यकर्त्याने १९ जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली. या गोष्टीचे गांभीर्य ओळखून, गडकरी यांनी पुणे येथील महिला व बाल विकास आयुक्तालयाला पत्र दिले तसेच दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर या मुलीच्या संगोपनाचा प्रश्न निकाली लागल्याची माहिती आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री गडकरी यांचे पत्र मिळाल्याच्या बाबीला बाल कल्याण समिती अध्यक्ष मंगला सपकाळ यांनी दुजोरा दिला. तथापि, ते आपण वाचले नसल्याचे त्या म्हणाल्या.