शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रभागा अस्वच्छ करताना गाडगेबाबा आठवा

By admin | Updated: March 5, 2015 01:48 IST

तुम्ही संतांचे दाखले देत असाल तर आम्हीही संत गाडगेबाबा व संत ज्ञानेश्वर यांची उदाहरणे देऊ शकतो, असे खडेबोल उच्च न्यायालयाने बुधवारी पंढरपूरची वारी करणाऱ्या वारकऱ्यांना सुनावले.

मुंबई : तुम्ही संतांचे दाखले देत असाल तर आम्हीही संत गाडगेबाबा व संत ज्ञानेश्वर यांची उदाहरणे देऊ शकतो, असे खडेबोल उच्च न्यायालयाने बुधवारी पंढरपूरची वारी करणाऱ्या वारकऱ्यांना सुनावले.नदीपात्रात धार्मिक विधी व बांधकामास मनाई करणाऱ्या आदेशाचा न्यायालयाने पुनर्विचार करावा, अशी विनंती करणारा अर्ज वारकऱ्यांनी न्यायालयात केला आहे. त्यावर कुठल्या कायद्याखाली तुम्ही येथे धार्मिक विधी करण्यास परवानगी मागत आहात, असा सवाल न्यायालयाने गेल्या महिन्यात केला. येथे धार्मिक विधी करणे हा आमचा मूलभूत अधिकार असल्याचा दावा वारकऱ्यांनी केला. त्यावर न्यायालयाने वारकऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले व ही बंदी उठवण्यास नकार दिला. चंद्रभागेचा काठ ही सरकारी मालमत्ता आहे. त्यामुळे तेथे घाण होणे गैर आहे. एकीकडे गंगा नदी स्वच्छ करण्याचा उपक्रम केंद्र सरकार राबवत असताना चंद्रभागा नदी अधिकच घाण होत आहे व याला निर्बंध घातल्यास वारकरी न्यायालयाचे दार ठोठावतात हे व्यवहार्य नाही, असे न्यायालयाने नमूद केले.मुळात आपण चंद्रावर जाण्याची भाषा करीत असताना पंढरपुरात मानवी विष्ठा मानवाकडून उचलली जाणे, हे दुर्दैवी आहे. या प्रकरणावर गेली २ वर्षे सुनावणी सुरू आहे आणि मानवी विष्ठा मानवाकडून उचलण्यास बंदी आणल्यानंतर व नदीपात्रात निर्बंध आल्यावरच वारकऱ्यांनी न्यायालयात धाव घ्यावी हे योग्य नाही, असेही न्या. अभय ओक व न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठाने ओढले.धार्मिक विधीस मनाईयाप्रकरणी एका सामाजिक संघटनेने अ‍ॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे. येथे मानवी विष्ठा मानवाकडूनच उचलली जाते यास मनाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. त्यावरील सुनावणीत न्यायालयाने येथील नदीपात्रात बांधकाम करण्यास व धार्मिक विधी करण्यास मनाई केली. विठ्ठलाच्या महापूजेसाठी दरवर्षी मुख्यमंत्री येतात. मात्र येथील स्वच्छेतचा मुद्दा कोणालाही महत्त्वाचा वाटत नाही, अशा शब्दांत शासनाला फटकारले.