शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीची धावपट्टी पाच वर्षांपासून रखडली

By admin | Updated: September 14, 2014 01:05 IST

छोट्या शहरांना मोठ्या शहरांशी हवाई मार्गाने जोडण्याची योजना शासनाने कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत विदर्भात काही जिल्हे हवाई मार्गाने जोडण्याचीही तयारी सुरू आहे. मात्र गडचिरोली या

सरकारचे दुर्लक्ष : जागेचा शोध घेऊनही कामाला सुरूवात नाहीगडचिरोली : छोट्या शहरांना मोठ्या शहरांशी हवाई मार्गाने जोडण्याची योजना शासनाने कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत विदर्भात काही जिल्हे हवाई मार्गाने जोडण्याचीही तयारी सुरू आहे. मात्र गडचिरोली या मागास जिल्ह्यातील हवाईपट्टीचे काम मागील पाच वर्षांपासून रखडलेले आहे. २००९ हे वर्ष पोलीस दलासाठी आजवरच्या इतिहासातील सर्वात काळे वर्ष ठरले. पोलीस-नक्षल चकमकीत ५१ पोलीस जवान शहीद झालेत. पोलीस जवानांना मानवंदना देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावर्षी गडचिरोलीत आले होते. मुंबईला गेल्यानंतर त्यांनी गडचिरोली येथे हवाईपट्टी बांधण्याचा निर्णय जाहीर केला. लगेच जिल्हा प्रशासनाला सूचना देऊन जागेचा शोधही सुरू झाला. बोदली, मेंढा, माडेतुकूम गावालगत जागा घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता. मात्र स्थानिक शेतकरी व काही कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यानंतर चामोर्शी मार्गावर गडचिरोली ते वाकडी दरम्यान जागा निश्चित करण्यात आली. राज्य शासनाची एक चमूही या ठिकाणी जागेचे मोजमाप करण्यासाठी आली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी अतुल पाटणे यांनी शासनाच्या या चमूला जिल्हाधिकारी कार्यालयात जागेबाबतही विस्तृत माहितीही दिली होती. पोलीस प्रशासनाला हेलिकॉप्टरही उपलब्ध करून देण्यात आले. मात्र मागील पाच वर्षात हवाईपट्टीच्या कामाची किंचितही प्रगती होऊ शकली नाही. नक्षल घटनेनंतर जखमी पोलीस जवानांना उपचारासाठी तत्काळ नागपुरात नेता यावे यासाठी या हवाईपट्टीचे निर्माण होणार होते. याशिवाय या छोट्या विमानतळाचा गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासालाही फायदाच होणार होता. मात्र हवाईपट्टी रखडल्याने सारे स्वप्नवत् ठरले आहे. आता परत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्यसचिव पी.एस. मिना यांनी गडचिरोलीचे विमानतळ होईल, असे सुतोवाच केले आहे. मात्र मागील पाच वर्षांपासून हा प्रस्ताव कागदावरच आहे.महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरण व गडचिरोली जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये विमानतळासाठी जागा अधिग्रहीत करण्यावरून वादंग निर्माण झाल्याने हवाईपट्टीचा हा प्रस्ताव कागदावरच राहिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)