शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकभर फराळ निघाला गडचिरोलीला

By admin | Updated: November 8, 2015 00:24 IST

रोजच्या जगण्यात प्रकाश माहीत नसलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना, दिवाळीच्या तेजोमय पर्वात नव्या कपड्यांसह फराळाची मेजवानी सोलापूर जिल्ह्यातील वडशिंगे

- इरफान शेख, कुर्डूवाडी (सोलापूर)रोजच्या जगण्यात प्रकाश माहीत नसलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना, दिवाळीच्या तेजोमय पर्वात नव्या कपड्यांसह फराळाची मेजवानी सोलापूर जिल्ह्यातील वडशिंगे येथील इसहाकभाई शेख यांच्या कुटुंबाकडून दिली जात आहे़ गेल्या पाच वर्षांपासून हे कुटुंब आदिवासी बांधवांची दिवाळी गोड करत आहे़ यंदा सुमारे सहा हजार कुटुंबांसाठी एक ट्रकभर फराळ (३० क्विंटल) जाणार आहे.हा फराळ गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड व सिरोंचा तालुक्यातील २५ गावांतील कुटुंबांना वाटण्यात येणार आहे.पाच वर्षांपूर्वी एका बातमीत आदिवासींच्या हलाखीच्या जगण्याचे वृत्त वाचून इसहाकभाई शेख यांच्या संवेदनशील मनाला चटका बसला़ आपण त्यांच्या जीवनात नसलो, तरी दिवाळीत तरी त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण आणावेत, असे त्यांनी ठरविले़ कुर्डूवाडी-बार्शी रस्त्यावरील चिंचगाव टेकडी येथील सत्संग आश्रमाचे प. पू. रामानंद सरस्वती महाराज यांनी इसहाकभार्इंच्या या कल्पनेला प्रोत्साहित केले़ इसहाकभाई यांनी रामसिद्ध बहुद्देशीय समाजसेवा संस्थेच्या माध्यमातून पहिल्या वर्षी अलापल्ली तालुक्यातील गावामध्ये दिवाळीचा फराळ पाठविला. यंदा भामरागड व सिरोंचा तालुक्यात फराळाचे वाटप केले जाणार आहे़ फराळ तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, ९ तारखेला सकाळी ७ वाजता खाऊ व कपडे नेण्यात येणार आहेत.कोण आहेत इसहाकभाईइसहाकभाई शेख हे वडशिंगे येथील अल्पभूधारक शेतकरी असून, दुधाचा जोडव्यवसाय करतात़ आई, पत्नीसह दोन मुले आणि एक कन्या असे त्यांचे कुटुंब आहे़ फराळाच्या ट्रकसह ते स्वत: दोन्ही मुलांसह आदिवासी गावात जातात़ खर्चाचा मेळ बसविण्यासाठी माढा आणि परिसरातील दानशूर व्यक्तींकडून मिळेल त्या स्वरूपात मदत घेतात़ गडचिरोली जिल्ह्यासह अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात त्यांनी फराळाचे वाटप केले आहे़