शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बच्या भितीने गडचिरोली घाबरली तेव्हा...

By admin | Updated: August 11, 2016 16:40 IST

गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात एका बॅगेत स्फोटके आढळल्याने नागरिक घाबरले.

ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. ११ -  सकाळी ११.३० वाजताची वेळ. गडचिरोली शहरातून शाळेसाठी निघालेले विद्यार्थी पाच किमी अंतरावर कॉम्प्लेक्स परिसरात आॅफीस पकडण्यासाठी लगबगीने निघालेले पुरूष व महिला कर्मचारी अशा स्थितीतीच शेकडो वाहनांची वर्दळ सुरू असताना गडचिरोली शहराचा मुख्य चौक असलेल्या इंदिरा गांधी चौकात बेवारस स्थितीत सुटकेस असल्याची माहिती मिळाली. तत्काळ पोलीस विभागाची सारी यंत्रणा जागरूक होऊन कामाला लागली. छत्तीसगडकडे जाणाºया धानोरा मार्गावरची वाहतूक ठप्प करण्यात आली. चामोर्शी, नागपूर, चंद्रपूर मार्गावर तत्काळ सामान्य नागरिकांना बाजूला करीत वाहतूक बंद करण्यात आली. जवळजवळ अर्धा ते पाऊण तास हा सर्व कार्यक्रम चालला. त्यानंतर पोलीस विभागाचे स्क्वॉड घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब विरोधी शोध, श्वॉन पथक घटनास्थळी आणण्यात आले. बॉम्ब शोधपथकाचे शेकडो कर्मचारी या कामी लागलेत. नंतर क्रेनसारखी एक पोलिसांचीच गाडी आणून दोन बाजुला दोर लावून ही सुटकेस अलगद उचलण्यात आली. तोपर्यंत संपूर्ण उपस्थितांच्या छातीचे ठोके धडधडत होते. गडचिरोलीत बॉम्ब आढळला, बॉम्ब कुणी ठेवला असेल, याच्या चर्चा सुरू झाल्या. अनेक तरूण या गर्दीतही सुटकेसपर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत होते. अखेरीस पोलिसांच्या यंत्रणेने ही सुटकेस उचलून अलगद पोलीस मुख्यालयाकडे नेली. त्यानंतर काही वेळाने हा सर्व प्रकार कदाचित स्वातंत्र्य दिन समोर असल्यामुळे पोलिसांच्या मार्क ड्रीलचा प्रकार असावा, अशी चर्चा पसरली. मात्र या संदर्भात गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांना विचारणा केली असता, मार्कड्रील नव्हती. संशयास्पद स्थितीत बेवारस सुटकेस आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर ती पोलिसांनी ताब्यात घेतली, अशी माहिती त्यांनी दिली.