शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

जी-पीएटीच्या परीक्षार्थींना मिळणार दहा वाढीव गुण, सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांना होणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 02:12 IST

आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) यांनी या वर्षी देशपातळीवर घेतलेल्या ग्रॅज्युएट फार्मसी अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट (जी-पीएटी) या पूर्वपरीक्षेमध्ये चुकीच्या दोन प्रश्नांची उत्तरे दुरुस्त करून, दहा गुणांची वाढ केल्याचे शपथपत्र औरंगाबाद खंडपीठात सादर केले.

औरंगाबाद : आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) यांनी या वर्षी देशपातळीवर घेतलेल्या ग्रॅज्युएट फार्मसी अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट (जी-पीएटी) या पूर्वपरीक्षेमध्ये चुकीच्या दोन प्रश्नांची उत्तरे दुरुस्त करून, दहा गुणांची वाढ केल्याचे शपथपत्र औरंगाबाद खंडपीठात सादर केले.या निर्णयामुळे जी-पीएटी परीक्षा देणाºया देशभरातील सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार असून, त्यांना १५ हजारांचे विद्यावेतनदेखील मिळणार आहे़ न्या़ आऱ एम़ बोर्डे आणि न्या़ ए़ एम़ ढवळे यांच्या खंडपीठासमोर प्रकरणाची सुनावणी झाली. त्या वेळी दाखल झालेल्या शपथपत्रावरून खंडपीठाने यासंबंधिची याचिका निकाली काढली़पदव्युत्तर औषधनिर्माणशास्त्र (एम़ फार्मसी) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) यांनी ग्रॅज्युएट फार्मसी अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट (जी-पीएटी) ही आॅनलाइन परीक्षा केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत (एचआरडी) २८ व २९ जानेवारी रोजी घेण्यात आली होती़ नंतर परीक्षेची उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली़ या उत्तरतालिकेत ८ प्रश्नांची उत्तरे चुकीची दिली गेली़ त्यामुळे याचिकाकर्त्याने याबाबत केंद्र्र शासनाकडे तक्रार नोंदविली, तसेच चुकीची उत्तरे दिल्याबाबत पुस्तकांचे पुरावे सादर केले. मात्र, शासनाने तक्रारीवर काहीच कारवाई केली नाही़नांदेड येथील दयानंद संभाजीराव मांजरमकर यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली़ याचिकेत, तज्ज्ञांचे विशेष पथक नेमावे, अशी विनंती केली होती़ त्यानुसार, तज्ज्ञांची समिती नेमून तपासणी केली असता, दोन प्रश्नांची उत्तरे चुकीची असल्याचे समोर आले़ त्या चुकीच्या प्रश्नांचे दहा गुण विद्यार्थ्यांना वाढवून दिल्याचे शपथपत्र खंडपीठात सादर केले़.