शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ विद्यार्थिनींचे भवितव्य अधांतरी

By admin | Updated: November 2, 2016 05:00 IST

निकषात बसत नसलेल्या राज्यातील ७७ नर्सिंग स्कूलची मान्यता भारतीय परिचर्या परिषदेने एका आदेशाने रद्द केली.

विलास गावंडे,

यवतमाळ- निकषात बसत नसलेल्या राज्यातील ७७ नर्सिंग स्कूलची मान्यता भारतीय परिचर्या परिषदेने एका आदेशाने रद्द केली. त्यामुळे या स्कूलमध्ये प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या १५४० विद्यार्थिनींचे शैक्षणिक भवितव्य अधांतरी आहे. निकषात बसत नसतानाही प्रवेश देऊन या महाविद्यालयांनी खेळ चालविला, अशी भावना विद्यार्थिनींमध्ये निर्माण झाली आहे. भारतीय परिचर्या परिषद दिल्लीकडून दर तीन वर्षांनी नर्सिंग स्कूलची तपासणी केली जाते. शिवाय प्रथम वर्ष प्रवेशासाठी दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. नवीन शैक्षणिक सत्रासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. या दृष्टीने आवश्यक ती तपासणी परिषदेकडून झाली. यात काही नर्सिंग स्कूलने निकष पूर्ण केले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार २९ आॅक्टोबर रोजी मान्यता रद्द झालेल्या नर्सिंग स्कूलची यादी परिषदेने जाहीर केली आहे. यामध्ये राज्यातील ७७ स्कूलचा समावेश आहे. या ठिकाणी प्रवेश घेतलेल्या १५४० विद्यार्थिनींना इतर ठिकाणच्या प्रवेशाची दारे बंद झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या भवितव्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.बारावीनंतर या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. अर्धेअधिक शैक्षणिक सत्र संपले असल्याने इतर अभ्यासक्रमालाही या विद्यार्थिनी मुकणार आहे. या परिस्थितीत काय तोडगा निघतो, याकडे लक्ष लागले आहे.>मान्यता रद्द झालेल्या नर्सिंग स्कूलची जिल्हानिहाय संख्या वर्धा चार, भंडारा तीन, यवतमाळ तीन, बुलडाणा तीन, गडचिरोली दोन, गोंदिया तीन, चंद्रपूर एक, अमरावती एक, अकोला एक, नांदेड दोन, अहमदनगर आठ, हिंगोली तीन, परभणी सात, औरंगाबाद सहा, मुंबई एक, नाशिक तीन, सांगली तीन, बीड चार, ठाणे एक, रत्नागिरी एक, लातूर पाच, उस्मानाबाद एक, नंदूरबार दोन, सोलापूर दोन.