शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अंतराळ क्षेत्रात देशाचे भविष्य उज्ज्वल

By admin | Updated: January 15, 2015 00:59 IST

केरळच्या थुंबा या लहानशा खेड्यातून गेलेले पहिले रॉकेट ते मंगलयानापर्यंतचा प्रवास देशातील संशोधकांनी केलेल्या कष्टातून साध्य झाला. हा प्रवास जितका रंजक आहे तितकाच प्रेरणादायीदेखील आहे.

प्रकाश मुजुमदार : ‘इन्स्पायर’मध्ये साधला विद्यार्थ्यांशी संवादनागपूर : केरळच्या थुंबा या लहानशा खेड्यातून गेलेले पहिले रॉकेट ते मंगलयानापर्यंतचा प्रवास देशातील संशोधकांनी केलेल्या कष्टातून साध्य झाला. हा प्रवास जितका रंजक आहे तितकाच प्रेरणादायीदेखील आहे. येणाऱ्या काळात अंतराळ क्षेत्रात देशाचे भविष्य उज्ज्वलच राहणार आहे, असे प्रतिपादन ‘इस्रो’चे माजी सल्लागार डॉ. प्रकाश मुजुमदार यांनी केले. केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे प्रायोजित व शिवाजी विज्ञान महाविद्यालयात आयोजित ‘इन्स्पायर’ या विज्ञान शिबिरात त्यांंनी बुधवारी विद्यार्थ्यांशी मोकळेपणाने संवाद साधला. डॉ.मुजुमदार यांनी यांनी ‘जर्नी आॅफ इंडियन सायन्स विथ स्पेसिफिक आॅफ इस्रो’ या विषयावर भारतीय विज्ञानाची विज्ञान क्षेत्रातील प्रगती व राष्ट्राला झालेला उपयोग यावर प्रकाश टाकला. देशात १९४६ पासून विज्ञानाच्या सकारात्मक कक्षांचा विस्तार सुरू झाला. देशात ‘इस्रो’ची स्थापना झाली आणि २१ फेब्रुवारी १९६९ ला अग्निबाणचे प्रक्षेपण झाले. या दोन्ही घटना भारताच्या उज्वल अंतराळ प्रवासाची नांदी ठरल्या, असे ते म्हणाले. ‘जीएसएलव्ही’चे निरनिराळे टप्पे तसेच निरनिराळ्या अग्निबाणांसंदर्भात त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या प्रश्नांनादेखील त्यांनी उत्तरे दिली.त्याअगोदर झालेल्या सत्रात मुंबई येथील सोमय्या कॉलेज आॅफ सायन्सचे डॉ. दीपक मोरे यांनी भौतिकशास्त्रावर मार्गदर्शन केले. यातील मूलभूत संकल्पनाची जोड जीवनातील घडामोडीशी घालून राष्ट्राच्या प्रगतीसाठी उपयोगात कसे आणता येईल याचा मूलमंत्र दिला. तिसऱ्या सत्रात हिस्लॉप महाविद्यालयाचे गणित विज्ञान प्रमुख प्रा. रुषी अग्रवाल यांनी ‘गणित दर्शन’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. शाम दारोकार, प्रा.जीवन मधुगिरी, प्रा.दीपक कडू यांनी या तिन्ही सत्रांचे संचालन केले. (प्रतिनिधी)