शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मोर्चापाड्यात जीवघेणी कसरत

By admin | Updated: July 18, 2016 04:02 IST

तालुक्यातील मोर्चापाडा व दसकोड गावहद्दीतील मोर्चापाडा गावाजवळील नदीवरील पूल मोडकळीस

हुसेन मेमन,

जव्हार- तालुक्यातील मोर्चापाडा व दसकोड गावहद्दीतील मोर्चापाडा गावाजवळील नदीवरील पूल मोडकळीस आल्याने, विद्यार्थी व नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन या धोक्कादायक पुलावरूनच ये-जा करावी लागत आहे. मोर्चापाडा व दसकोड नदीवरील पुलाजवळ दोन्ही बाजूने पक्के व चांगले रस्ते आहेत. मात्र पुलाची दुरुस्ती नसल्याने, पूर्ण पूल गंजून मोडून गेला आहे. त्यामुळे या धोकादायक पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी, येथील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. जव्हार तालुक्यातील मोर्चापाडा व दसकोड या दोन गावांमध्ये ४ कि. मी. अंतर असून, मोर्चापाडा येथे पावसाळ्यात एसटी बस येत नसल्याने येथील शाळेत व कॉलेजला जाणारे विद्यार्थी व नागरिकांना बस गाठण्यासाठी दसकोड गावात जावे लागत आहे. मात्र मोर्चापाडा व दसकोड या गावाजवळील नदीवर ३५ ते ४० वर्षापूर्वी लोखंडी पुलाचे बांधाकाम करण्यात आले आहे. परंतु हा लोखंडी पूल जुनाट होऊन, गंजून गेल्याने, पूर्ण पूल जीर्ण होऊन मोडून गेला आहे. दसकोड पुलावरून यापूर्वी जीप, मोटारसायकल, ट्रक्स, याची वाहतूक सुरू होती. मात्र, या पुलाला अनेक वर्ष होऊनही दुरुस्ती नसल्याने, हा पूल धोकादायक बनला आहे. तरीही येथील ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थ्यांना पर्याय नसल्याने, या धोकादायक पुलावरून प्रवास करावा लागत आहे. मोर्चापाडा येथील विद्यार्थ्यांना नाइलाजाने रोज याच मोडकळीस पुलावरून विद्यार्थ्यांना शाळा व कॉलेजला ये-जा करावे लागत आहे. दसकोड गावात येणारी एसटी बस गाठण्यासाठी याच मोडकळीस व धोकादायक पुलावरून पायी प्रवास करावा लागत आहे.मोर्चापाडा येथील नागरिकांना कामानिमित्त व विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजला जाण्यासाठी या मोडकळीस पुलावरून जायचं नसेल, तर ११ कि.मी. पायी प्रवास करून मेढा येथे एसटी बसवर जावे लागत आहे. मोर्चापाडा व दसकोड नदीवरील धोकादायक पूल गेल्या अनेक वर्षापासून दुरु स्तीला आला आहे. या पुलापर्यंत दोन्ही बाजूने चांगले रस्ते आहेत. मात्र नदीवरील पूलच नादुरुस्त व मोडकळीस असल्याने, विद्यार्थी व नागरिकांचे हाल झाले आहेत. तरीही जीव मुठीत घेऊन या धोकादायक पुलावरून ये-जा करावी लागत आहे. येथील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला यापूर्वी पुलाच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. याचा मोठा फटका येथील नागरिक व विद्यार्थ्यांना बसत आहे.