शहरं
Join us  
Trending Stories
1
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
2
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
3
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
4
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
5
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
6
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
7
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
8
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
9
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
10
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
11
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
12
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
13
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
14
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
15
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
16
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
17
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
18
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
20
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?

दलित तरुणावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार

By admin | Updated: July 5, 2015 01:53 IST

बालसुधारगृहातून पळून गेल्यानंतर खून झालेल्या सनी शिंदे या दलित तरुणावर शनिवारी दुपारी बुरुडगावमध्ये हजारो दलित कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पोलीस

अहमदनगर : बालसुधारगृहातून पळून गेल्यानंतर खून झालेल्या सनी शिंदे या दलित तरुणावर शनिवारी दुपारी बुरुडगावमध्ये हजारो दलित कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार झाले. खून झाल्यानंतर तब्बल चार दिवसांनंतर सनीवर अंत्यसंस्कार झाले. सनीच्या खुनाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी सनीच्या अंत्यसंस्कारानंतर पत्रकारांशी बोलताना केली.बुरुडगावमधील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी सनीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी सनी, त्याचे वडील आणि एका भावाला अटक केली होती. सनीच्या वडील व भावाला कोर्टाने पोलीस कोठडी दिली होती, तर त्याची बालसुधारगृहात रवानगी झाली होती. मात्र ३० मे रोजी तो सुधारगृहातून पळाल्यानंतर १ जुलैला त्याचा मृतदेह बीड जिल्ह्यात आढळून होता. त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एका नगरसेवकासह १५ जणांवर बीड जिल्ह्यातील पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.शुक्रवारी सनीचा मृतदेह नगरमध्ये आणण्यात आला होता. मात्र त्याच्या नातेवाइकांनी अंत्यसंस्कारास नकार दिला होता. खा. आठवले आल्याशिवाय अंत्यसंस्कार होणार नाहीत, असा निर्णय त्याच्या नातेवाइकांनी घेतला होता. चौघांना अटकसनीच्या खुनाप्रकरणी चार संशयितांना नगर पोलिसांनी अटक करून पाटोदा (जि. बीड) पोलिसांच्या ताब्यात दिले. एकूण १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)वाढते अत्याचार : नितीन आगे ते सनी शिंदे अशी दलितांच्या खुनांची मालिका वेदनादायी आहे. प्रेमप्रकरणातून असे खून होत आहेत, ही चीड आणणारी घटना आहे. आंतरजातीय व आंतरधर्मीय प्रेमसंबंधाला नकार देणाऱ्या कुटुंबावर समाजाने बहिष्कार टाकावा. आंतरजातीय विवाह होणाऱ्या जिल्ह्यांना १० कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, असे आठवले म्हणाले.