शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सुकलेल्या फळबागांचा करणार अंत्यविधी

By admin | Updated: May 30, 2016 02:29 IST

अधिका-यांना वाटल्या कार्यक्रमाच्या पत्रिका : वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतक-यांचा पवित्रा.

वाशिम: प्रशासकीय अधिकार्‍यांच्या व कर्मचार्‍यांच्या दप्तर दिरंगाईमुळे शेतकर्‍यांना फळबाग व पीक विमासह अनेक योजनांच्या अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे. शिवाय निसर्गही कोपल्यामुळे फळबाग वाळून गेली. त्यामुळे फळझाडे उखडून त्यांचा अंत्यविधी कृषी अधिकार्‍यांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे, जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी सुशिला देवढे यांनी २९ मे रोजी घेतलेल्या पत्रपरिषदेत सांगितले. यासाठी निमंत्रण पत्रिका छापून अधिकार्‍यांना आमंत्रणसुद्धा दिले आहे. मालेगाव तालुक्यातील दुबळवेल येथील सुशिला सुभाषराव देवढे, शालीकराम विश्‍वनाथ लादे, भवानी भाऊराव पोफळे व योगेश बाबाराव देवढे या शेतकर्‍यांनी त्यांच्या मालकीच्या दुबळवेल येथील शेतांमध्ये गत सहा वर्षांपूर्वी संत्रा, डाळिंब व आंबा यासारख्या फळपिकांची लागवड केली. दरम्यानच्या कालावधीत अस्मानी व सुलतानी संकटांना तोंड देत, उसनवारी, कर्ज काढून फळबागांचे संगोपन केले. पाणीटंचाई व नैसर्गिक आपत्तीमुळे झाडांचे संगोपन करणे कठीण बनलेल्या शेतकर्‍यांनी फळबाग पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशासनातील अधिकार्‍यांचे उंबरठे झिजविले असता, शासकीय नियमातील आडकाठीमुळे दुबळवेल गावाचा समावेश असलेले मंडळ विम्यासाठी पात्र ठरत नाही. फळबाग पीक विमा लागू होण्यासाठी सदरहू मंडळात किमान २0 हेक्टर शेतजमिनीवर फळबाग लागवड असणे शासकीय नियमानुसार गरजेचे आहे. प्रत्यक्षात किन्हीराजा मंडळात ३९ हेक्टर एवढी फळबाग आहे, असे असतानाही आतापर्यंत सदर विभागाने फळबागेचे क्षेत्र कमी दाखविल्याचे गौडबंगाल काय, हा शेतकरी वर्गाला अचंबित करणारा प्रश्न ठरणार आहे. दरम्यान, २0१६ पासून आता यापुढे फळ पीक विमा लागू होईल, असे कृषी विभागाने संबंधित शेतकर्‍यांना कळविले आहे. शेतकरी फळ पीक विमा योजनेसाठी पात्र असताना त्यांच्याकडून विमा भरून घेतला असता तर त्यांच्यावर ही पाळी आली नसती. कृषी विभागाच्या दप्तर दिरंगाईमुळे हा प्रकार घडला आणि म्हणून याच्या निषेधार्थ शेतजमिनीवरील फळझाडे उखडून काढून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी मालेगाव, मंडळ अधिकारी आदींच्या उपस्थितीत झाडे जाळून त्याचा प्रतीकात्मक अंत्यविधीचा कार्यक्रम दुबळवेल येथे ३१ मे रोजी आयोजित करून कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका वितरित केल्या आहेत.