शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान अखेर जिंकला, पण संथ खेळीमुळे खड्ड्यात राहिला; १४ षटकांत जिंकायचं होतं, पण... 
2
महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
3
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन दोषी, फेडरल गन प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय
4
शाकाहरीबाबत तुमचं मत काय? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर
5
PM Narendra Modi : सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती
6
भाजपचे धक्कातंत्र! पुन्हा नवीन चेहऱ्याला संधी, मोहन माझी यांना ओडिशाचे मुख्यमंत्रिपद दिले
7
स्पर्धेबाहेर होण्याच्या भितीने पाकिस्तानची कामगिरी सुधारली; जॉन्सनच्या तडाख्याने हुडहुडी भरली
8
Fact Check: मोदींविरोधात घोषणा देणारी महिला कंगनाला मारणाऱ्या CISFची आई नाही!
9
Vande Bharat मध्ये शिरले शेकडो विना तिकीट प्रवासी; video व्हायरल होताच नेटकरी भडकले...
10
युवराज सिंगकडून पाकिस्तानच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं सांत्वन, भन्नाट Video 
11
एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर; तपासात सत्य बाहेर येताच पोलीसही हैराण
12
MMS लीक होताच खचली! निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत आली; भोजपुरी क्वीनचा बोल्ड अंदाज
13
Aadhar Card : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला; सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा
14
वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम भजी आणि बिस्किट खाताय?; 'हे' फूड कॉम्बिनेशन हानिकारक
15
"पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण...", माजी खेळाडूची बोचरी टीका!
16
अजित पवारांच्या NCP चा नेता 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंसोबत केली चर्चा, नेमकं काय घडतंय?
17
कुठे गायब आहे 'जुम्मा-चुम्मा' गर्ल?, ३२ वर्षांपासून आहे कलाविश्वापासून दूर
18
जेलमधून घरी पोहचला युवक, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?
19
२४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध
20
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

माजी आमदार राजीव राजळे यांच्यावर अंत्यसंस्कार; नगर जिल्ह्यावर शोककळा; पंकजा मुंडे, राम शिंदे यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 2:57 AM

पाथर्डीचे माजी आमदार राजीव अप्पासाहेब राजळे (४८) यांचे शनिवारी (दि.७) रात्री निधन झाले. कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील दादापाटील राजळे महाविद्यालयाच्या प्रांगणात हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत व शोकाकुल वातावरणात रविवारी

अहमदनगर : पाथर्डीचे माजी आमदार राजीव अप्पासाहेब राजळे (४८) यांचे शनिवारी (दि.७) रात्री निधन झाले. कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील दादापाटील राजळे महाविद्यालयाच्या प्रांगणात हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत व शोकाकुल वातावरणात रविवारी दुपारी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजळे यांच्या निधनाने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली.स्व. राजळे यांच्या मागे पत्नी आमदार मोनिका राजळे, वडील माजी आमदार अप्पासाहेब राजळे, आई मोहिनी राजळे, दोन मुले, एक बंधू असा परिवार आहे. स्व. राजळे हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे, माजी मंत्री अशोक पाटील डोणगावकर (गंगापूर, जि. औरंगाबाद) यांचे जावई, तर माजी आमदार शंकरराव गडाख (नेवासा) यांचे ते मेहुणे होते.राजळे हे काही दिवसांपासून न्युमोनियामुळे आजारी होते़ मुंबईत उपचार सुरू असताना शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. रविवारी सकाळी त्यांचा पार्थिव देह कासार पिंपळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला व तेथेच अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. फुलांनी सजविलेल्या ट्रकमधून राजळे यांची अंत्ययात्रा टाळ-मृदंगाच्या गजरात निघाली. दुपारी चारच्या सुमारास ज्येष्ठ सुपुत्र कृष्णा व कनिष्ठ बंधू राहुल यांनी राजळे यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.या वेळी झालेल्या शोकसभेला विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी खासदार, आमदार, विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह हजारो नागरिक उपस्थित होते. राजळे यांच्या निधनाने पाथर्डी शहर व तालुक्यातील अनेक गावात बंद पाळून लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली.