शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

आतशबाजीची हौस अंगाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 05:19 IST

लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडवा या दोन दिवसांत मोठ्या आवाजाच्या फटाक्यांची आतशबाजीची हौस १७७ जणांना चांगलीच महागात पडली

ठाणे : लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडवा या दोन दिवसांत मोठ्या आवाजाच्या फटाक्यांची आतशबाजीची हौस १७७ जणांना चांगलीच महागात पडली आहे. फटाके फोडून ध्वनिप्रदूषणासह वायुप्रदूषण केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात कारवाई केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.मुंबई उच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणासंबंधी आवाजाची मर्यादा वेगवेगळ्या क्षेत्रासाठी ठरवून दिली होती. तर दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या आवाजाची मर्यादा पाळा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ठाणे शहर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिला होता. त्याप्रमाणे रविवारी आणि सोमवारी फटाके फोडणाऱ्या १७७ जणांविरोधात महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्ट अधिनियमानुसार गुन्हे नोंदवले आहेत. ही कारवाई ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये केली आहे. रविवारी दिवसभरात ८७ तर सोमवारी ९० जणांविरोधात कारवाई केली. तसेच त्यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी त्यांच्याकडून १२०० रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत अनामत रक्कम घेऊन सोडून दिल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)>न्यायालयीन आदेशानुसार आवाजांच्या मर्यादेचा तक्ता झोनची वर्गवारी डेसीबल मर्यादा दिवस/ रात्रीऔद्योगिक क्षेत्र७५/ ७०वाणिज्य क्षेत्र६५/५५निवासी क्षेत्र५५/४५शांतता क्षेत्र५०/४० > २१ विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल रॉकेट, बॉम्ब आदी फटाक्यांवर बंदी असताना, तसेच शहर पोलीस आयुक्तांचा मनाई आदेशाच्या भंग करून त्यांची घोडबंदर रोड परिसरात विक्री करणाऱ्या २१ विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात वेगवेगळे चार गुन्हे नोंदवून त्यांच्याकडून जवळपास ६५ हजारांचे फटाके जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.कासारवडवलीचे पोलीस नाईक प्रवीण घोडके यांनी दिलेल्या तक्रारीत भानुदास पाटील, कुंदन पाटील, प्रकाश पाटील, विनोद ठाकरे, संजय जाधव, जगन्नाथ पाटील आणि राकेश शेळके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून २,०४० रुपयांचे फटाके तर कासारवडवलीचे पोलीस नाईक जयेश तामोरे यांनी दिलेल्या तक्रारीत कांतीलाल गवळी, सुधीर गुरखा, मनोज शिंगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्याकडील १९ हजार ९९१ रुपयांचे तसेच कासारवडवलीचे पोलीस नाईक अमोल साळवी यांनी नोंदवलेल्या तक्रारीत, दिनेश पटेल, नागेश सोळंके, संगीता चव्हाण, दामाजी पटेल, संतोष पिंगळे यांच्याविरोधात हे गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून १ हजार ७०० रुपयांचे फटाके जप्त केले. त्याचबरोबर कासारवडवलीचे पोलीस कॉन्स्टेबल मनोज पवार यांनी नोंदवलेल्या तक्रीरात, महेंद्र वाघ, मृत्युंजय प्रजापती, ज्ञानेश्वर पाटील, रवजी पटेल, अजय मढवी आणि अर्जना पावले यांच्याकडून ३९ हजार ६४३ हजारांचे फटाके जप्त केले. या चार गुन्ह्यांतील एकूण २१ यांच्याविरोधात भारतीय स्फोटक पदार्थ अधिनियमानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.