शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई-पॅसिफिक रॅली संजयकडून पूर्ण

By admin | Updated: June 21, 2016 03:07 IST

वादळी पावसाचा सामना करीत पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने आशिया-पॅसिफिक रॅली मालिकेतील क्वीन्सलँड रॅली पूर्ण करण्याची कामगिरी केली

पुणे : वादळी पावसाचा सामना करीत पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने आशिया-पॅसिफिक रॅली मालिकेतील क्वीन्सलँड रॅली पूर्ण करण्याची कामगिरी केली. त्याने चौथ्या क्रमांकासह २० गुणांची कमाई केली. दरम्यान भारताच्याच गौरव गीलने सर्वाधिक ७७ गुणांसह रॅलीमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. आॅस्ट्रेलियातील सनशाईन कोस्टवर ही रॅली पार पडली. पावसामुळे मार्ग धोकादायक झाल्याने अखेरच्या चार स्टेज रद्द करण्यात आल्या. शनिवार व रविवार अशा दोन दिवशी झालेल्या या रॅलीच्या प्रॉडक्शन करंडक गटात संजय सहभागी झाला होता. चौथ्या क्रमांकाचे १२ व ८ बोनस गुण त्याला मिळाले.न्यूझीलंडमध्ये व्हांगारेई रॅली ही पहिली फेरी पार पडली. त्यात पहिल्या दिवशी इलेक्ट्रिक बिघाड, तर दुसऱ्या दिवशी पूल पार करताना कार घासल्यामुळे संजयला माघार घ्यावी लागली होती. यामुळे ही रॅली किमान पूर्ण करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट त्याने ठेवले होते. ते त्याने साध्य केले.संजयने जपानच्या कुस्को संघांचे प्रतिनिधित्व केले. संजयने सांगितले की, ‘‘आव्हानात्मक रॅली पूर्ण केल्याने समाधान वाटते. मार्ग ओला व निसरडा होता. मुळातच खडतर असलेला मार्ग पावसामुळे आणखी आव्हानात्मक ठरला. त्यामुळेच रॅली पूर्ण करणे महत्त्वाचे ठरले. तर ११व्या स्पेशल स्टेजला आमच्या कारचा ड्राइव्ह शाफ्ट तुटला, पण कार नीट चालवीत आम्ही रॅली पूर्ण होईल, याची काळजी घेतली. जेवणाच्या वेळेत कुस्को संघाने कार सुसज्ज केली. त्यानंतर पुन्हा पंक्चरमुळे समस्या निर्माण झाली होती. कुस्को संघाच्या तंत्रज्ञांनी चांगली कामगिरी बजावली.’’ (क्रीडा प्रतिनिधी)दुसऱ्या फेरीनंतरचे गुण (सर्वसाधारण) : गौरव गील (एमआरएफ स्कोडा, भारत-७७ गुण), फॅबियन क्रेइम (एमआरएफ स्कोडा, जर्मनी-६१), मायकेल यंग (कुस्को रेसिंग, न्यूझीलंड ५०), संजय टकले (कुस्को रेसिंग, भारत २०).पहिल्या दिवशी आम्ही जपानच्या फुयुहिको ताकाहाशीपेक्षा सरस कामगिरी केली. मार्क बिअर्डपेक्षा काही सेकंदांनीच मागे होतो. त्याच वेळी ड्राइव्ह शाफ्ट तुटला. सुदैवाने पाच किलोमीटरचीच स्टेज होती. त्यानंतर १४ किलोमीटरचा ट्रान्सपोर्ट सेक्शन होता. एक चाक घासत होते. यामुळे दोन मिनिटे वाया गेली. - संजय टकले