शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी शिष्यवृत्तीमुळे ओबीसींच्या परदेशी शिक्षणाची स्वप्नपूर्ती; राज्यातील ७५ विद्यार्थी ठरले लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2024 19:17 IST

येत्या वर्षांत विद्यार्थीसंख्या वाढण्याचा अंदाज

राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना सरकारने लागू केली आहे. यंदा तब्बल ७५ ओबीसी विद्यार्थी या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत. येत्या वर्षात ही संख्या आणखी वाढविली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे या निर्णयाने ओबीसी समाजात समाधान व्यक्त होत आहे.   

ओबीसी समाजातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असतानाही आर्थिक परिस्थितीमुळे शक्य होत नाही. या विद्यार्थ्यांची ही इच्छापूर्ती करण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सरकारने परदेशी शिष्यवृत्ती योजना जाहीर केली. तब्बल ७५ विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ देण्याचा निर्णय ३० ऑक्टोबर २०२३ रोजी घेण्यात आला. पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले. 

या अर्जांची इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणेचे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने छाननी केली. अर्जातील त्रुटींची विद्यार्थ्यांकडून पूर्तता करून शाखा आणि अभ्यासक्रमनिहाय ‘वर्ल्ड क्यूएस रँकिंग’ तयार केली.  ही यादी यादी राज्य सरकारला सादर केली. ही क्रमवारी लक्षात घेऊन ७५ पात्र विद्यार्थ्यांची परदेश शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली. २६ सप्टेंबरला ही यादी महायुती सरकारने मंजूर केली. 

यासोबतच शासनामार्फत परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण संपल्यानंतर देशाची सेवा आणि त्यांच्या ज्ञानाचा फायदा देशाला करून देणे बंधनकारक करण्यात आले. तशी हमीच या विद्यार्थ्यांकडून घेण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणाचे स्वप्नपूर्ती करतानाच देशसेवेसाठीची एक सक्षम फळीच तयार केली जात असल्याचा विश्वासही व्यक्त होत आहे. 

एक कोटींपर्यंतची मिळतेय मदत : दिवसे 

‘मी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी गावचा रहिवासी आहे. ओबीसी परदेश शिष्यवृत्तीच्या मदतीने युनायटेड किंगडममधील युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहममध्ये ‘मास्टर इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट’ करीत आहे. महायुती सरकारच्या निर्णयामुळे मला ही शिष्यवृत्ती मिळाली. माझासारखे आणखी ७५ विद्यार्थी ही शिष्यृवत्ती घेऊन आपले स्वप्न पूर्ण करीत आहेत. ही शिष्यवृत्ती मिळाली नसती तर कदाचित मला माझे शिक्षणही पूर्ण करता आले नसते. साधारणत: ५० लाखांच्या खर्चाचा विचारही शक्य नव्हता. काही विद्यार्थ्यांसाठी तर एक कोटी रुपयांपर्यंतचा खर्च सरकार या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून करीत आहे. ही समाजासाठीची मोठी उपलब्धी आहे,’ असे रोहित सुरेश दिवसे यांनी सांगितले. 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीEducationशिक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीState Governmentराज्य सरकार