शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआयआयमध्ये विद्यार्थ्यांचे पुन्हा महाभारत

By admin | Updated: January 8, 2016 03:44 IST

फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी आलेल्या अभिनेता गजेंद्र चौहान

पुणे : फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी आलेल्या अभिनेता गजेंद्र चौहान यांच्या विरोधात विद्यार्थी गुरुवारी पुन्हा आक्रमक झाले. विद्यार्थ्यांनी एफटीआयआयच्या गेटसमोर बसून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी त्यांना हटकताच विद्यार्थी आक्रमक झाले. परिणामी विद्यार्थ्यांना थोपविण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. यावेळी २३ विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चौहान गुरुवारी प्रथमच एफटीआयआयमध्ये येणार असल्याने पोलिसांनी आधीच विद्यार्थ्यांना नोटिसा बजावल्या होत्या. तर विद्यार्थीही आक्रमक तयारीत होते. गुरुवारी तब्बल दोन वर्षांनंतर नियामक मंडळाची बैठक झाली. या बैठकीपूर्वी चौहान अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार असल्याने सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर चौहान यांच्या स्वागतासाठी प्रशासनाने ढोल पथकाला आमंत्रित केले होते. सकाळपासूनच विद्यार्थी आक्रमक असल्याने त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला.‘डाऊन डाऊन फ ॅसिझम डाऊन-डाऊन’, ‘गजेंद्र चौहान वापस जाओह्ण अशा घोषणांनी विद्यार्थ्यांनी एफटीआयआयचा परिसर दणाणून सोडला. विद्यार्थ्यांचा विरोध डावलून चौहान यांनी नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी बैठकीला अपर सचिव व आर्थिक सल्लागार डॉ. सुभाष शर्मा, चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी, निर्माता-दिग्दर्शक बी. पी. सिंग, चित्रपट कलाकार सतीश शाह,राहुल सोलापूरकर, संयुक्त सचिव (चित्रपट) संजय मूर्ती, अनघाघैसास, नरेंद्र पाठक, चित्रपट समीक्षक भावना सोमय्या, ऊर्मिल थाप्लीयाल, प्रांजल सायकिया, फिल्म्स डिव्हिजनचे महानिदेशक मुकेश शर्मा, भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेचे संचालक प्रशांत पाठराबे, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे विशेष अधिकारी चैतन्य प्रसाद, चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रवण कुमार, सत्यजित रे चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेचे संचालकसंजय पटनायक उपस्थित होते. (प्रतिनिधी)