शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानावर फळ पिकवणारे तंत्रज्ञान

By admin | Updated: December 19, 2015 03:23 IST

रासायनिक पदार्थांचा वापर न करता फळ पिकवणारे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करणार असल्याची माहिती कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधान

नागपूर : रासायनिक पदार्थांचा वापर न करता फळ पिकवणारे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करणार असल्याची माहिती कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चेच्या उत्तरात दिली.आंबा, केळी, पपई यासह इतर फळे पिकवण्यासाठी रासायनिक पदार्थांचा वापर केल्यास ते आरोग्यासाठी घातक असतात. परंतु नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रासायनिक पदार्थांचा वापर न करता फळे पिकवता येतील. द्राक्ष, आंबा, संत्रा व केळी अशा फळांसाठी संशोधन केद्र उभारण्यात येणार आहे. याचा फळ बागायतदारांना उपयोग होईल. राज्यात १४ लाख शेतकऱ्यांना ग्रीन कार्ड देण्यात आले. या वर्षात ही संख्या ४० लाखांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.चांगल्या दर्जाच्या उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. जैविक खतात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. बियाणे, कीटकनाशके विक्रीत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ९६ विक्रे त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ३०९ विक्रे त्यांचे परवाने निलंबित तर ४३ जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.१६३ प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)बीटी बियाण्याच्या किमती कमी करणारबीटी बियाण्याची वाढती मागणी विचारात घेता हे बियाणे उपलब्ध होण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहे. या बियाण्याच्या किमती किलोमागे ५०० रुपयांनी कमी क रण्यात येतील. बियाणे व रासायनिक खतांच्या देशभरात सारख्याच किमती असाव्या यासाठी केंद्र सरकार दर निश्चित करणार असल्याची माहिती खडसे यांनी दिली.