शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

काटकसरीचा सल्ला तरीही उधळपट्टी

By admin | Updated: April 4, 2017 01:09 IST

शहराच्या प्रथम नागरिक म्हणून निवड झाल्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी काटकसरीने कामकाज करणार असे जाहीर केले

पुणे : शहराच्या प्रथम नागरिक म्हणून निवड झाल्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी काटकसरीने कामकाज करणार असे जाहीर केले, तरी भारतीय जनता पार्टी या त्यांच्या पक्षाने मात्र महापौरांसह अन्य पदाधिकाऱ्यांच्या दालनांच्या नूतनीकरणाचा घाट घालत जोरदार खर्च चालवला आहे. रंगरंगोटी, नव्या खुर्च्या याबरोबरच नगरसेवकांची संख्या जास्त असल्याचे सांगत दोन दालनांचे एकत्रीकरण करत भले मोठे सभागृहच महापालिका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आकाराला आणण्यात आले आहे.साधारण वर्षभरापूर्वीच तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व पदाधिकाऱ्यांच्या दालनांचे नूतनीकरण करून घेतले होते. त्यासाठी बराच खर्चही केला होता. त्यानंतर महापौरपदी निवड झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रशांत जगताप यांनी त्यामुळेच आपले दालन आहे तसेच ठेवले. तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी मात्र त्या पदावर निवड होताच आपल्या दालनाचे नूतनीकरण केले होते. त्यालाही बराच खर्च करण्यात आला होता.सर्व दालने जवळपास नवीच असल्याने महापालिका निवडणुकीत सत्तेवर आलेल्या भाजपाकडून दालने आहे तशीच ठेवली जातील असे अपेक्षित होते. मात्र, सुरुवातीचे काही दिवस गेल्यानंतर लगेचच या दालनांच्या नूतनीकरणाला सुरुवात करण्यात आली. नगरसेवकांची संख्या जास्त आहे असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाच्या जुन्या कार्यालयांमधील पार्टिशन काढून एकच मोठा हॉल तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये पक्षनेत्यांसह सर्वांच्या खुर्च्या बदलण्यात आल्या आहेत. सिलिंग व फ्लोअरिंगही बदलण्याचे आदेश भवन रचना विभागाला देण्यात आले आहेत.त्याशिवाय महापौर तसेच सभागृह नेत्यांच्या दालनातही नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. तेथीलही सर्व आसन बदलण्यात येत आहेत. महापालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत कमी होत चालले आहेत. आगामी काळात अनेक मोठ्या योजना सुरू होणार असून, त्याला केंद्र व राज्य सरकारची मदत मिळणार असली तरी महापालिकेलाही मोठा वाटा उचलावा लागणार आहे. (प्रतिनिधी)>दालनांचे नूतनीकरण होत असले तरी त्याचा खर्च फार नाही. सत्ताधारी पक्षनेत्यांच्या आदेशाने काम होत आहे. भवन रचना विभागाला देखभाल दुरुस्तीसाठी स्वतंत्र तरतूद असते. त्यातून हा खर्च होत आहे. - संदीप खांदवे, कार्यकारी अभियंता, भवन रचना विभागपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची छबीराष्ट्रवादी व काँग्रेस यांची सत्ता होती त्या वेळी सर्व पदाधिकाऱ्यांच्या दालनात पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची छायाचित्रे झळकत होती. ती आता काढून टाकण्यात आली असून, सगळीकडे नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रे झळकावण्याची तयारी सुरू आहे.मनसेचे पूर्वी २९ नगरसेवक होते. या वेळी त्यांचे फक्त दोनच नगरसेवक निवडून आल्यामुळे त्यांच्या कार्यालयाची जागा बदलून पूर्वीपेक्षा लहान जागा देण्यात आली आहे. विरोधी पक्षनेत्याच्या दालनाचेही नूतनीकरण करण्यात येत आहे. त्या दालनाची अँटी चेंबर काढून टाकून एकच मोठी जागा करण्यात आली आहे. या दालनातीलही सर्व खुर्च्या बदलण्यात आल्या आहेत.