शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भासाठी मुंबईत मोर्चा

By admin | Updated: July 27, 2016 23:45 IST

राज्यात स्वतंत्र विदर्भाची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 27 - राज्यात स्वतंत्र विदर्भाची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, स्वतंत्र विदर्भासाठी मुंबईत राणीबाग ते आझाद मैदान असा पहिला धडक मोर्चा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने काढल्याचा दावा केला आहे. बुधवारी काढलेल्या मोर्चाचे रूपांतर आजाद मैदानात जाहीर सभेत झाले. या वेळी अ‍ॅड. सुरेश माने यांनी सरकारवर टीका करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.माने म्हणाले की, स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन देत भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली. मात्र, ते आश्वासन पूर्ण करण्याऐवजी सरकार कारणे देत आहे. छोट्या राज्याच्या रूपात विदर्भाचा विकास व्हावा, एवढी माफक अपेक्षा आहे. विदर्भ मागासलेला आहे, म्हणून विकासाचा अनेक क्षेत्रांत अनुशेष बाकी आहे. मात्र, मराठवाडा तर अति मागासलेला असून, रोजगार नियोजन, जलव्यवस्थापन, उद्योग व वीज, रस्ते, शेतीपंप अशा विविध सुविधांपासून मराठवाड्यातील लोक वंचित आहेत. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाप्रमाणे लवकरच स्वतंत्र मराठवाड्याची मागणी होण्यासाठी मराठवाडा आर्थिक विकास कार्यक्रम राबवण्याची मागणी त्यांनी केली.मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे, प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्याची मागणी माने यांनी केली. तसे शक्य नसल्यास १५ लाख रुपयांपर्यंतचे सामान्य नागरिकांचे कर्ज माफ करा, असेही ते म्हणाले. याशिवाय सच्चर समिती, प्रा. कुंडू समिती, रहेमान समिती आणि रंगनाथ मिश्रा समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांनी केली......................या मोर्चात धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, आवामी विकास पार्टीचे अध्यक्ष समशेर खान पठाण, निवृत्ती ब्रिगेडियर सुधीर सावंत आणि हजारो कार्यकर्ते सामील झाले होते. तरी सोमवारी संगणक परिचालकांनी सीएसटी येथे केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे, राणीबाग येथून मोर्चा काढण्यास आयोजकांना पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती. त्यामुळे भायखळा पोलिसांनी मोर्चाला अटकाव केला. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयोजकांसोबत चर्चा करत मोर्चा काढण्यास परवानगी दिली.