शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपीसाठी मोर्चा

By admin | Updated: October 17, 2015 03:19 IST

‘शेतकऱ्यांनी परिवर्तन केले म्हणून भाजपा-शिवसेनेचे सरकार आले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले; अन्यथा त्यांच्या आयुष्यात मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळाली नसती

कोल्हापूर : ‘शेतकऱ्यांनी परिवर्तन केले म्हणून भाजपा-शिवसेनेचे सरकार आले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले; अन्यथा त्यांच्या आयुष्यात मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळाली नसती, याचे भान ठेवून फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने राहावे. नाही तर पुढील वर्ष सरकारसाठी वाईट जाईल,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला. एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘स्वाभिमानी’ने शुक्रवारी कोल्हापूर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर इशारा मोर्चा काढत साखर कारखानदारांसह सरकारला तंबी दिली.खासदार शेट्टी म्हणाले, ‘या वर्षी साखरेला २८०० रुपये दर आहे. दुष्काळामुळे उसाचे उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादनही कमी होणार असल्याने साखरेचे दर तीन हजारांच्या वर जातील. त्यामुळे एकरकमी ‘एफआरपी’ देण्यास अडचण येणार नाही. तरीही कारखानदारांनी रडीचा डाव केला, तर ‘एफआरपी’ वसूल केल्याशिवाय राहणार नाही. साखर कारखान्यांच्या सभेत टप्प्याटप्प्याने ‘एफआरपी’ देण्याचे बेकायदा ठराव केले आहेत. हे ठराव त्यांना मागे घ्यावे लागणार आहेत. तसेच राज्यातील विभागीय साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढून इशारा देणार आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत सरकार काय करते ते बघूया. सरकार कारखानदारांच्या बाजूने राहिले तर सरकारविरोधात बंड करावे लागेल.